Sunday, June 21, 2026
Homeब्रेकिंग न्यूजNashik News : लक्झरी बसची दुचाकीला धडक; दोन तरुणांचा मृत्यू

Nashik News : लक्झरी बसची दुचाकीला धडक; दोन तरुणांचा मृत्यू

पंचवटी | प्रतिनिधी Panchavati

- Advertisement -

पंचवटी परिसरातील स्वामीनारायण पोलीस चौकीसमोरील महामार्गावर भरधाव लक्झरी बसने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने दोन तरुणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बुधवारी पहाटे घडली. अपघातानंतर बस चालक वाहनासह घटनास्थळावरून पसार झाला असून पंचवटी पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून शोधमोहीम सुरू केली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, यज्ञराज काशीराम पांडे (वय २७, रा. पाथर्डी फाटा) आणि आयुष राजेंद्र कासार (वय २०, रा. चेहेडी, नाशिक रोड) हे दुचाकीवरून जात असताना हा अपघात झाला. पहाटे सुमारे २.२५ वाजता स्वामीनारायण पोलीस चौकीसमोरील हायवेवर ‘हंसचाल’ कंपनीची एसी स्लीपर लक्झरी बस (AR 11 L 9002) भरधाव वेगाने जात होती. बस चालकाने वाहनावरील नियंत्रण न राखता पुढे असलेल्या टीव्हीएस स्टार सिटी दुचाकीला (MH 18 AE 6356) पाठीमागून जोरदार धडक दिली.

या धडकेत दुचाकीवरील दोन्ही तरुण गंभीर जखमी होऊन रस्त्यावर फेकले गेले. त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचार सुरू असताना दोघांचाही मृत्यू झाला. अपघातानंतर चालकाने जखमींना मदत न करता घटनास्थळावरून पलायन केल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.

या प्रकरणी चेतन जगदीश भामरे (वय २२, रा. पाथर्डी फाटा) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पंचवटी पोलीस ठाण्यात अज्ञात बस चालकाविरुद्ध निष्काळजीपणे वाहन चालवून मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास उपनिरीक्षक प्रकाश नेमाणे करीत आहेत.

ताज्या बातम्या

उद्या पासून राज्य विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन; लोकप्रतिनिधींनी जनहिताचे प्रश्न मांडावेत आणि...

0
मुंबई | वृत्तसंस्था महाराष्ट्र राज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला उद्यापासून (२२ जून) प्रारंभ होत असून हे अधिवेशन १० जुलैपर्यंत चालणार आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...