नाशिक । प्रतिनिधी Nashik
भाच्याच्या मारहाणीत मामाचा धक्कादायक मृत्यू झाला आहे. यात भाच्यासह त्याच्या वडिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सुनील नानाजी सुर्यवंशी (रा. सुयोग कॉलनी, मालेगाव, सध्या रा. खर्जुल मळा, नाशिकराेड) असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. याप्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला.
नाशिकरोड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुनीलला त्याचे वडील नानाजी सुर्यवंशी व सुनीलच्या संशयित भाच्याने बेदम मारहाण केली. त्यामुळे सुनीलला बिटको रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र सुनीलचा बुधवारी (दि.२५) मृत्यू झाला.
जिल्हा शासकीय रुग्णालयात सुनीलचे शवविच्छेदन केल्यानंतर अंगावर मुका मार आढळला. त्यामुळे पोलिसांनी सखोल तपास केला असता मारहाणीचा प्रकार समोर आला आहे. सुनील बेरोजगार असल्याने व पिता पुत्रांसह भाच्यात वाद होत असल्याचे समोर आले आहे. त्यानुसार संशयावरून पित्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.