Thursday, September 3, 2026
Homeब्रेकिंग न्यूजघाटकोपरमध्ये मध्यरात्री चाळीवर दरड कोसळली; आत्तापर्यंत ६ जणांचा मृत्यू, शोधकार्य सुरु

घाटकोपरमध्ये मध्यरात्री चाळीवर दरड कोसळली; आत्तापर्यंत ६ जणांचा मृत्यू, शोधकार्य सुरु

मुंबई | Mumbai
मुंबईच्या घाटकोपरमधील अशोक नगर येथील गौसिया चाळ परिसरात डोंगराचा भाग कोसळल्याची (Ghatkoper Ashok Nagar Landslide) दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेत अनेक जण अडकल्याची भिती होती. या दुर्घटनेत २ जणांचा मृत्यू झाला होता, तसेच या ठिकाणी एनडीआरएफकडून युद्धपातळीवर बचाव कार्य सुरु असून यात आता मृतांचा आकडा वाढला आहे. आत्ता पर्यंत या दुर्घटनेत ५ ते ६ जणांचा मृत्यू झाला आहे. ढिगाऱ्याखाली आणखी काही जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना वाचवण्यासाठी अग्निशमन दलाकडून शर्थीचे प्रयत्न सुरू आहे.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, घाटकोपर आणि साकीनाका परिसराच्या दरम्यान असलेल्या अशोकनगरमधील गौसिया चाळीजवळ पहाटे सुमारे ३.४८ वाजता डोंगराचा मोठा भाग अचानक कोसळला आणि दरड थेट पायथ्याशी असलेल्या दोन ते तीन घरांवर कोसळल्याने घरांमध्ये झोपलेल्या नागरिकांना सावरण्याची संधीही मिळाली नाही. या दुर्घटनेत आत्तापर्यंत ५ ते ६ जणांचा मृत्यू झाला आहे. तर आणखी काही जण ढिगाऱ्याखाली अडकले असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

जर अजूनही मराठी येत नसेल तर आता थेट…; प्रताप सरनाईकांची माहिती, आजच मोठा निर्णय होणार

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, घाटकोपर पोलिस, वॉर्ड कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. मध्यरात्रीपासून घटनास्थळावर बचावकार्य युद्धपातळीवर सुरू असून आतापर्यंत ६ जणांचे मृतदेह ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आले. मृतांमध्ये दोन लहान मुलांचा समावेश आहे.

मृतांच्या कुटुंबियांना ३ लाखांची मदत
दरम्यान, साकीनाका येथील दुर्घटनेत मृतांचा कुटुंबातील लोकांना पालिकेकडून ३ लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. तर दुर्घटना घडलेल्या ठिकाणी रहात असलेल्या लोकांचे सुरक्षितस्थळी पुर्नवसन केले जाईल. अशी देखील माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे. तर या पूर्वीच तिथे राहणाऱ्या लोकांना तो परिसर धोकादायक असल्याने नोटीसा बजावल्या होत्या. असे महापौर रितू तावडे यांनी सांगितले.

नेमकं काय घडलं?
बुधवारी पहाटे 3.48 मिनिटांच्या सुमारास मुंबई महापालिकेच्या अग्निशमन दलाला या घटनेची माहिती मिळाली. घटनेची मह्ती मिळताच अग्निशमन दल, एनडीआरएफ आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तसेच, तत्काळ अडकलेल्या नागरिकांच्या बचावासाठी युद्धपातळीवर बचावकार्य सुरू करण्यात आले. समोर आलेल्या माहितनुसार, पहाटे डोंगराचा काही भाग अचानक कोसळला तसेच त्यातील माती आणि दगड दोन ते तीन घरांवर पडले. त्यामुळे त्या घरातील रहिवाशांना बाहेर पडण्यास वेळ मिळाला नसल्याचे सांगण्यात येत आहे. अद्याप याबाबत अधिकृत आकडेवारी आलेली नसून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. यादव विकी, वाजिद अली, आरिफ शेख, मन्नत, आबन शेख आणि सद्दाम शेख अशी ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांची नावे आहेत.

ताज्या बातम्या

Nashik News : आदिवासी विद्यार्थी आंदोलकांशी अभिजित दिपकेंनी भेट देऊन साधला...

0
नाशिक । प्रतिनिधी Nashik गोल्फ क्लब मैदानावर गेल्या १२ दिवसांपासून विविध न्याय्य मागण्यांसाठी आदिवासी विद्यार्थ्यांचे सुरू असलेले प्राणांतिक उपोषण आता राज्य सरकारच्या अडचणी वाढविणारे ठरत...