Monday, March 23, 2026
Homeब्रेकिंग न्यूजDeepak Kesarkar: संजय राऊतांच्या आरोपांवर दिपक केसरकरांचं स्पष्टीकरण; म्हणाले, तेव्हाच माझी आणि...

Deepak Kesarkar: संजय राऊतांच्या आरोपांवर दिपक केसरकरांचं स्पष्टीकरण; म्हणाले, तेव्हाच माझी आणि त्यांची ओळख झाली…

मुंबई | Mumbai
भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर यांना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. अशोक खरातचे इतर राजकीय नेत्यांसोबतचे फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या व्हायरल फोटोंवरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटाचे नेते दीपक केसरकर यांना लक्ष्य केलेय. दीपक लोंढे आणि अशोक खरात हे व्यावसायिक भागिदार असल्याचा संशय आहे. त्याच कारणातून दीपक लोंढे याला ताब्यात घेऊन पोलीस चौकशी करीत आहे. असे असताना केसरकर यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.

ईशान्येश्वर मंदिरासाठी रस्ता बनवण्यासंदर्भात भेट
माजी मंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांनी खरातसोबतच्या फोटोबाबत खुलासा केलाय. अशोक खरात त्यांचे कृत्य घृणास्पद आहे, त्याचा निषेध करतो. मात्र, त्यांच्या ओळखीच्या लोकांना यात गुंतवणे आणि फोटो प्रसिद्ध करणे ही चुकीची बाब आहे. अशोक खरातसमवेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे आणि मी एकत्र असल्याचा फोटोही सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, असे म्हणत केसरकर यांनी व्हायरल फोटोमागची स्टोरी सांगितली आहे. ईशान्येश्वर मंदिरासाठी एक रस्ता बनविण्यासंदर्भात अशोक खरात एकनाथ शिंदे यांना भेटण्यासाठी आले होते, तेव्हाच माझी आणि त्यांची ओळख झाली असे दीपक केसरकर यांनी स्पष्ट केले.

- Advertisement -

Bhaskar Jadhav: अधिवेशनापूर्वीच SIT नेमण्यात आली, निम्मे मंत्रिमंडळ यात असल्याने हे प्रकरण बाहेर येऊ द्यायचे नव्हतं; भास्कर जाधवांचा मोठा दावा

ईशान्येश्वर मंदिरामुळे आमची ओळख
मी मुंबईच्या बाहेर असल्याने अशोक खरात प्रकरणावर काही खुलासे करु शकलो नाही. त्यामुळे, व्हिडिओच्या माध्यमातून मी माझी भूमिका मांडतोय, माजी मंत्री तथा शिवसेना नेते दीपक केसरकर यांनी म्हटले. इशान्येश्वर मंदिरासाठी एका रस्त्याच्या कामाबाबत ते मुंबईत आले असताना माझी आणि त्यांची ओळख झाली, त्यावेळचा तो फोटो आहे. नाशिकमधील इशान्येश्वर मंदिरामुळे आमची ओळख आहे, तसेच त्यांचा एस्ट्रॉनॉमीमध्ये चांगला अभ्यास असल्याने माझ्यासारख्या अनेक लोकांची त्यांच्याशी ओळख आहे. दुसरा फोटो त्यांच्या मुलीच्या लग्नाच्या वेळेचा आहे, पण त्यांच्या व्यक्तिगत जीवनाबद्दल माझी आणि त्यांची कधीही चर्चा झाली नाही, असे स्पष्टीकरण दीपक केसरकर यांनी अशोख खरात प्रकरणावरील व्हायरल फोटोच्या संदर्भाने दिले आहे. तसेच, माझ्यासारख्या अनेक राजकीय लोकांचे केवळ फोटो आले म्हणून आरोप करणे हे चुकीचे आहे.

माझ्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणे चुकीचे
संजय राऊत यांच्या आरोपांना प्रत्युत्तर देताना केसरकर म्हणाले, ‘संजय राऊत यांनी केलेले आरोप बिनबुडाचे आहेत. कॅप्टन खरात कधीही माझ्या कार्यालयात आला नाही. तो माझं विभाग चालवत होता, असे म्हणणे पूर्णपणे चुकीचं आहे. माझ्या कार्यकाळात शिक्षण आणि मराठी भाषा विभागात जे ऐतिहासिक निर्णय झालं. ते क्वचितच इतर कोणत्याही मंत्र्यांच्या काळात झालं असतील. त्यामुळे विभागाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणे चुकीचे आहे. केवळ फोटोंच्या आधारे कोणत्याही राजकीय व्यक्तीचा या प्रकरणाशी संबंध जोडून चुकीची प्रसिद्धी देऊ नये ही विनंती’.

ताज्या बातम्या

default-featured-image

Maharashtra Politics : “…तर आम्ही राजीनामा देऊ”; DCM शिंदेंसमोर शिवसेना आमदारांचा...

0
मुंबई | Mumbai सातारा जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपने शिवसेना आणि राष्ट्रवादी या आपल्याच मित्रपक्षांना धोबीपछाड दिली. त्यामुळे यानिमित्ताने सत्ताधारी महायुतीत जुंपल्याचे बघायला मिळाले. शिंदे सेनेचे...