Monday, May 20, 2024
Homeजळगावनिंभोरसिम येथील दिपक पाटील वारकरी प्रशिक्षणात प्रथम

निंभोरसिम येथील दिपक पाटील वारकरी प्रशिक्षणात प्रथम

रावेर|प्रतिनिधी raver

निंभोरसिम (ता.रावेर) येथील हभप दीपक पाटील यांनी आळंदी (alandi) येथील वारकरी प्रशिक्षण संस्थेत (Warkari Training Institute) ४ वर्षाचा अभ्यासक्रम यशस्वीपणे पूर्ण करत, या कालावधीत प्रथम क्रमांक पटकावला आहे.

- Advertisement -

आळंदी येथील वै.स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराज संस्थान संचालित वारकरी शिक्षण संस्थेत दीपक पाटील यांनी २०१७ ते २०२२ पर्यन्त चार वर्षाचा आभ्यासक्रम यशस्वीपणे पूर्ण केला आहे.या बँचमध्ये त्यांनी अव्वल क्रमांक मिळवला असून, त्यांच्या यशाबद्दल निंभोरसिम गावात आनंद साजरा करण्यात आला.यावेळी नारायण मिस्त्री,रामभाऊ चौधरी,नंदकिशोर चौधरी,संजय महाजन,दिनेश चौधरी, ताराचंद चौधरी,आनंता पाटील व गावकऱ्यांनी त्यांचा स्वागत सन्मान केला.

- Advertisment -

ताज्या बातम्या