Wednesday, May 8, 2024
Homeजळगावदुर्लक्षित,दुर्बल घटकांतील युवकांचे मनोबल वाढविण्याचे ‘दीपस्तंभ’चे कार्य

दुर्लक्षित,दुर्बल घटकांतील युवकांचे मनोबल वाढविण्याचे ‘दीपस्तंभ’चे कार्य

जळगाव – Jalgaon – प्रतिनिधी :

त्येकाने आपल्या जीवनात येणार्‍या आव्हानांना नवीन संधी या सकारात्मक दृष्टीकोनातून बघितले तर त्यातून बाहेर पडून तुम्ही कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होऊ शकतात.

- Advertisement -

तसेच दिव्यांग,अनाथ तरुणांना त्यांच्या जीवनातील आव्हानांना सामोरे जाऊन समाजात एक वेगळी ओळख निर्माण करण्याची प्रेरणा व पाठबळ दीपस्तंभ फाउंडेशनकडून मिळते. असे प्रतिपादन प्रज्ञाचक्षु आयएएस अधिकारी स्पर्श गुप्ता यांच्यासह मान्यवरांनी केले.

दीपस्तंभ फाउंडेशन च्या 16 स्थापना दिनानिमित्त विविध क्षेत्रातील दीपस्तंभ सदस्यांचे अनुभव कथन या ऑनलाइन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

अनघा मोडक वक्ता व प्रशिक्षक (मुंबई ), समरेन्द्र निंबाळकर न्यायाधीश व कवी (नाशिक) , शीतल पवार ,कार्यकारी संपादक सकाळ (पुणे) यांनी वेगवेगळया विषयांवर मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गौरव महाले तर प्रस्तावना मनोबल प्रकल्पातील विद्यार्थी पंकज गिरासे या विद्यार्थ्याने केली. समरेंद्र निंबाळकर यांनी सहवेदना या स्वरचित कवितेचे व्हिडिओच्या माध्यमातून सादरीकरण केले.

तर संग्राम जोशी यांनी संस्थेच्या कार्याबद्दल मनोबल पोवाडा सादर केला.कार्यक्रमाचा समारोप यजुर्वेंद्र महाजन यांनी केला.राजेंद्र पाटील ,रजत भोळे यांनी कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन केले.

आजी माजी विद्यार्थ्यानी दिला आठवणींना उजाळा

माझ्या आठवणीतील दीपस्तंभ या ऑनलाइन कार्यक्रमात दीपस्तंभ फाऊंडेशन चे सदस्य , आजी माजी विद्यार्थी यांनी ऑनलाईन संवाद साधला.

संदीपकुमार साळुंखे , तहसीलदार नामदेव पाटील, उत्पादन शुल्क अधीक्षक गणेश पाटील ,मनपाचे लेखाधिकारी कपिल पवार , स्टेट बँक ऑफ इंडिया जालना येथील वरिष्ठ व्यवस्थापक सुयोग नगरदेवळेकर , सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर भारती पाटील , उपजिल्हाधिकारी मानसी पाटील, पांडूरंग कोठुळे पुणे ,हिना शेख यांनी मनोगत व्यक्त करुन आठवणींना उजाळा दिला. केले. सूत्रसंचलन संदीप पाटील, देवल पाटील यांनी केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या