Thursday, May 2, 2024
Homeदेश विदेशअमेरिकेत महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना

अमेरिकेत महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना

दिल्ली | Delhi

महात्मा गांधीजींच्या (Mahatma Gandhi) पुण्यतिथी दिवशीच एक धक्कादायक बातमी अमेरिकेतून समोर आली आहे.

- Advertisement -

अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यातील एका बागेमध्ये बसवण्यात आलेल्या गांधीजींच्या सहा फुटी पुतळ्याची काही अज्ञात समाजकंटकांकडून विटंबना करण्यात आली आहे.

या घटनेनंतर अमेरिकेत राहणाऱ्या अनिवासी भारतीयांनी या प्रकाराची कडक शब्दांत निंदा केली असून द्वेष भावनेने करण्यात आलेल्या या गुन्ह्याची स्थानिक प्रशासनाकडून चौकशी करण्याची मागणी केली आहे.

ही मुर्ती 6 फूट उंच असून तिचे वजन 294 किलोग्रॅम इतके आहे. काही महिन्यांपुर्वी गांधीजींच्या पुतळ्याचे नुकसान करण्याची घटना अमेरिकेत घडली होती.

- Advertisment -

ताज्या बातम्या