Sunday, May 5, 2024
Homeनगरबदनामीची धमकी देत विवाहितेवर अत्याचार

बदनामीची धमकी देत विवाहितेवर अत्याचार

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

विवाहितेला घरातून घेऊन जाऊन तिच्यावर अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी नगर तालुक्यातील एका गावात राहणार्‍या पीडित विवाहितेने नगर तालुका पोलीस ठाण्यात मंगळवारी (दि. 10) सायंकाळी दिलेल्या फिर्यादीवरून तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

कुमार सुनील जगावने (रा. आळंदी फाटा, पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी त्याला ताब्यात घेत अटक केली असून न्यायालयाने त्याला 16 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. जगावने व फिर्यादी एकमेकांच्या ओळखीचे आहेत. जगावने याने फिर्यादीला 7 ऑक्टोबर रोजी दुपारी तिच्या घरातून दुचाकीवर बसून रत्नागिरी येथे नेले. तेथील एका लॉजवर बळजबरीने तिच्यावर अत्याचार केला. आत्महत्या करण्याची व बदनामी करण्याची पीडितेला भीती दाखवून तिच्याकडून दोन लाख 17 हजार रुपये घेतले व पसार झाला. दरम्यान, फिर्यादीने 10 ऑक्टोबर रोजी नगर तालुका पोलीस ठाण्यात धाव घेऊन घडलेला प्रकार सांगितला.

पोलिसांनी पीडितेच्या फिर्यादीवरून जगावने विरोधात अत्याचार, खंडणी आदी कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल होताच पोलीस उपनिरीक्षक रणजित मारग यांच्या पथकातील पोलीस अंमलदार विशाल टकले, सुभाष थोरात, शिवाजी माने यांनी जगावने याला ताब्यात घेत अटक केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या