Thursday, October 22, 2026
Homeब्रेकिंग न्यूजसांगलीतील १० वीच्या विद्यार्थ्याची दिल्लीत आत्महत्या; सुसाईड नोटमध्ये आढळला धक्कादायक मजकूर

सांगलीतील १० वीच्या विद्यार्थ्याची दिल्लीत आत्महत्या; सुसाईड नोटमध्ये आढळला धक्कादायक मजकूर

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
दिल्लीतील सेंट कोलंबस शाळेच्या प्राचार्या आणि शिक्षिकांच्या जाचाला कंटाळून दहावीत शिकत असलेल्या मराठी विद्यार्थ्याने मंगळवारी मेट्रो स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवरून खाली रस्त्यावर उडी मारून आत्महत्या केली. शौर्य प्रदीप पाटील असे पीडित विद्यार्थ्यांचे नाव असून तो नवी दिल्लीतील राजीवनगर भागात राहत होता. या घटनेने राज्यासह संपूर्ण देश हादरला असून आता या घटनेचा पालकांकडून निषेध करण्यात येत आहे.

शौर्य प्रदीप पाटील हा मूळचा सांगली जिह्यातील खानापूर तालुक्यातील ढवळेश्वरचा रहिवासी आहे. त्याचे वडील प्रदीप पाटील हे सोने-चांदी गलाई व्यवसाय निमित्त गेल्या अनेक वर्षापासून दिल्ली येथे स्थायिक आहेत. त्यामुळे शौर्य हा त्यांच्या कुटुंबीयांसह दिल्लीतील राजीव नगर भागात वास्तव्यास होता. तो दिल्लीतील सेंट कोलंबस विद्यालयात इयत्ता दहावीच्या वर्गात शिक्षण घेत होता. मंगळवार, १८ नोव्हेंबर रोजी राजेंद्रनगर मेट्रो स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक २ वरून त्याने खाली रस्त्यावर उडी मारून आत्महत्या केली.

- Advertisement -

शौर्यने केलेल्या आत्महत्येची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. जखमी अवस्थेतील शौर्यला पोलिसांनी उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. पण, त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. शौर्यचे वडील कामानिमित्त गावी ढवळेश्वरला आले होते. याची माहिती त्यांना मिळाल्यानंतर ते तातडीने दिल्ली येथे पोहोचले. गुरुवारी (20 नोव्हेंबर) त्याच्यावर गावी अंत्यसंस्कार होणार आहेत. दरम्यान या प्रकरणी राजा गार्डन मेट्रो पोलीसांनी शाळेच्या मुख्यध्यापिका अपराजिता पॉल, मनू कालरा, युक्ती महाजन आणि ज्युली व्हर्गिस या शिक्षिकांविरोधात गुन्हा दाखल केला.

शाळेच्या बॅगेत सापडली चिठ्ठी
दिल्ली पोलिसांना शौर्य पाटील याच्या स्कूल बॅगमध्ये सुसाइड नोट सापडली. त्यात ‘मेरा नाम शौर्य पाटील हैं… इस मोबाइल… नंबर पर कॉल कर देना प्लीज… आय अॅम व्हेरी सॉरी… आय डीड धीस…पर स्कूलवालोंने इतना बोला की, मुझे यह करना पडा. यदी किसी को जरूरत हो तो मेरे अंग दान कर देना. मेरे पॅरेंटसने बहुत कुछ किया, आय अॅम सॉरी, मैं उनको कुछ नहीं दे पाया… सॉरी भैय्या… सॉरी मम्मी, आपका आखरी बार दिल तोड रहा हूं… स्कूल की टीचर है ही ऐसी क्या बोलू….असा स्कूल बॅगमध्ये सापडली सुसाईड नोटमध्ये उल्लेख होता.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

Ahilyanagar : 12 जागांसाठी उमेदवार जिल्हा बँकेच्या आखाड्यात; कोण कोण झाले...

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 21 संचालक मंडळाच्या जागांसाठी होत असलेल्या निवडणुकीत बुधवारी अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी निवडणूूक बिनविरोधचा फुसका बार फुसका ठरला....