नवी दिल्ली : रविवारी सकाळी दिल्लीच्या अनाज मंडी परिसरात लागलेय आगीत ४३ जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाची २७ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. दरम्यान, अग्निशमन दलाल या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. तसेच ५० हून अधिक जणांना वाचवण्यात अग्नि शामक दलाला यश आले आहे.
दरम्यान आज पहाटेच्या सुमारास चार मजली इमारतीला आग लागल्याने ४३ नागरिकांना आपला जीव गमवावा लागला असून एनडीआरएफ घटनास्थळी दाखल झाले आहे.या आगीत जखमींना लोक नायक जय प्रकाश (एलएनजेपी) रुग्णालय, हिंदूराव आणि राम मनोहर लोहिया (आरएमएल) रुग्णालय, लेडी हार्डिंग्ज रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अग्निशमन दलामार्फत मदतकार्य अद्याप सुरू आहे.
या इमारतीत लघु उदयॊग चालविणारे लहान कारखाने असून पॅकेजिंग आणि प्लास्टिक पिशव्या इत्यादी बनवत असत. या इमारतीत मजूर कामगार लोक वास्त्यव्यास होते. दिल्ली सरकारकडून मृताच्या नातेवाईकास १० लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे.