नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
दिल्ली विधानसभा निवडणुकीचे निकाल हाती आले आहेत. भाजपने दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीत मोठा विजय मिळवलाय. आपचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल आणि माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया, सत्येंद्र जैन यांनाही पराभवाचा सामना करावा लागलाय. दिल्लीत भाजपने २७ वर्षांनी पुनरागमन केलेय. गेल्या १० वर्षांपासून दिल्लीवर आपची एकहाती सत्ता होती. यामुळे आप कोणालाच जुमानत नव्हती. या काळात कोणते कोणते निर्णय घेतले, काय काय उद्योग केले याच्या फाईल बाहेर जाऊ नयेत म्हणून नायब राज्यपालांनी दिल्ली सचिवालय सील करण्याचे आदेश दिले आहेत.
गेली दहा वर्षे दिल्लीच्या राजकारणात निर्विवाद वर्चस्व मिळवणाऱ्या अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाला मोठा पराभव स्वीकारावा लागलाय. तर दुसरीकडे गेल्या दहा वर्षात सातत्याने पराभव स्वीकारव्या लागणाऱ्या भारतीय जनता पक्षाला या निवडणुकीत मोठे यश मिळाले आहे. दिल्लीतील विधानसभेच्या ७० जागांसाठी नुकतीच मतदान प्रक्रिया पार पडली होती. त्यानंतर आज मतमोजणी झाली.
दरम्यान, निकाल हाती आल्यानंतर आपचा पराभव झाल्यानंतर नायब राज्यपालांकडून आदेश जारी करण्यात आलाय. दिल्लीतील सामान्य प्रशासन विभागाने एक आदेश जारी केलाय. यामध्ये सरकारी डेटा आणि सुरक्षेचा मुद्दा लक्षात घेऊन सचिवालय पूर्णपणे सील करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
भाजपाने ३० जागा जिंकल्याचे समजताच सक्सेना यांनी हाचलाची केल्या आहेत. सामान्य प्रशासन विभागाने आपल्या आदेशात सचिवालयातील कागदपत्रांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली आहे. विभागाच्या परवानगीशिवाय कोणतीही फाइल, कागदपत्रे, संगणक हार्डवेअर इत्यादी दिल्ली सचिवालयाच्या बाहेर नेले जाऊ शकत नाही. तसेच, सर्व विभाग, एजन्सी आणि मंत्री परिषदेच्या कॅम्प ऑफिसना विभागाच्या परवानगीशिवाय कोणतेही रेकॉर्ड किंवा फाइल्स हटवू नयेत, असे निर्देश देण्यात आले आहेत.
आपचा दारुण पराभव
दिल्लीत विधानसभेच्या ७० जागांसाठी निवडणुका पार पडल्या. ज्यात भाजपने ७० पैकी ४८ जागांवर निर्विवाद वर्चस्व मिळवलेय. त्यामुळे भाजपने स्पष्ट बहुमत मिळवलेय. मात्र, दुसरीकडे आम आदमी पक्षाला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागलाय. आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा आणि माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांचा पराभव झाला आहे. आपला या निवडणुकीत केवळ २२ जागा मिळाल्या असून काँग्रेसला भोपळा ही फोडता आला नाही.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा