Thursday, May 2, 2024
Homeमुख्य बातम्यामोदीजी सांगा, कुठं यायचं!, लुकआऊट नोटीसनंतर मनीष सिसोदिया भडकले

मोदीजी सांगा, कुठं यायचं!, लुकआऊट नोटीसनंतर मनीष सिसोदिया भडकले

दिल्ली | Delhi

केंद्रीय अन्वेशन विभागाने (CBI) दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया (Manish Sisodia) यांच्यासह १३ जणांविरोधात लूक आऊट नोटीस जारी (Look Out Circular LOC) केली आहे. दिल्ली उत्पादन शुल्क धोरणाच्या अंमलबजावणीतील कथित भ्रष्टाचारप्रकरणी (Delhi Excise Policy scam) ही कारवाई करण्यात आली आहे.

- Advertisement -

दरम्यान, या लूक आऊट नोटिशीला मनिष सिसोदियांनी ट्विटरवरून आव्हान दिले आहे. त्यांनी हे आव्हान थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच दिले. ‘तुमचे सर्व छापे अयशस्वी ठरले आहेत, काहीही सापडलेले नाही, एक पैशाची चोरी सापडली नाही, आता तुम्ही लूकआऊट नोटीस जारी केली आहे की मनीष सिसोदिया उपलब्ध नाहीत. ही काय नौटंकी आहे मोदीजी? मी दिल्लीत बिनधास्त फिरतोय, सांगा कुठे येऊ? तुम्हाल मी काय सापडत नाहीए का?’ असं ट्विट करत सिसोदिय यांनी मोदी सरकारला थेट आव्हान दिलं आहे.

केजरीवालांची मोदी सरकारवर टीका

सिसोदियां यांच्यावरील कारवाईवरून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केंद्रातील मोदी सरकारवर ट्वीटद्वारे निशाणा साधला आहे. सर्वसामान्य जनता महागाईने त्रस्त असताना त्याकडे लक्ष देण्याऐवजी रोज सकाळी उठून सीबीआय-ईडीचा खेळ सुरू केला तर देशाची प्रगती कशी होणार? असा प्रश्न केजरीवाल यांनी उपस्थित केला आहे.

‘ज्यावेळी सर्वसामान्य जनता महागाईने त्रस्त आहे. करोडो तरुण बेरोजगार आहेत. अशा वेळी केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांशी बेरोजगारी आणि महागाईशी लढायला हवे, त्या ऐवजी ते संपूर्ण देशाशी लढत आहेत. रोज सकाळी उठून सीबीआय-ईडीचा खेळ सुरू करतात.’ अशी टीका करत अशाने देशाची प्रगती कशी होईल? असा प्रश्नही त्यांनी विचारला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या