Tuesday, March 25, 2025
Homeदेश विदेशDelhi Election Result 2025 : दिल्लीत अजित पवारांना मोठा धक्का; सर्व उमेदवारांचे...

Delhi Election Result 2025 : दिल्लीत अजित पवारांना मोठा धक्का; सर्व उमेदवारांचे डिपॉझिट जप्त

नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi

दिल्ली विधानसभा निवडणुकीत (Delhi Assembly Elections) भारतीय जनता पक्षाने मोठा विजय मिळवला आहे. या निवडणुकीत दिल्लीकरांनी आम आदमी पक्षाचा ‘झाडू’न पराभव केला आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाच्या दिग्गज नेत्यांना पराभवाचा सामना करावा लागला असून यात ‘आप’चे प्रमुख अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) माजी उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया (Manish Sisodia) आणि माजी मंत्री सत्येंद्र जैन यांचा समावेश आहे. तर दिल्लीच्या मुख्यमंत्री अतिशी या विजयी झाल्या आहेत

- Advertisement -

निवडणूक आयोगाच्या (Election Commission) अधिकृत वेबसाईटनुसार, भाजपने एकूण ७० जागांपैकी आतापर्यंत ३९ जागा जिंकल्या आहेत. तर ९ जागांवर मोठी आघाडी घेतली आहे. दुसरीकडे ‘आप’ने १७ जागा जिंकल्या असून ५ जागांवर आघाडीवर आहे. त्यामुळे दिल्लीत भाजपची सत्ता निश्चित झाली असून तब्बल २७ वर्षानंतर नवी दिल्लीत कमळ फुलले आहे. तर या निवडणुकीत काँग्रेसला (Congress) भोपळाही फोडता आलेला नाही.

तसेच या निवडणुकीत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने (NCP) देखील आपले नशिब आजमवले होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने तब्बल २३ उमेदवारांना (Candidates) निवडणुकीच्या मैदानात उतरवले होते. पण त्यापैकी सर्वांचा दारुण पराभव झाला आहे. या उमेदवारांचा फक्त पराभव झाला नाही तर त्यांचे डिपॉझिट देखील जप्त झाले आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला दिल्लीत केवळ ०.०३ टक्के मते मिळाली आहेत. जुलै २०२३ मध्ये अजित पवार आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे विभाजन झाल्यानंतर दिल्लीतील ही पहिलीच विधानसभा निवडणूक होती.

अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांनी दिल्ली विधानसभा निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली होती. यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने बुरारी, बादली, रिठाला, मंगल पुरी, शालिमार बाग, चांदणी चौक, मातिआ महल, बाली मारान, मोती नगर, मदीपूर, हरी नगर, जनकपुरी, विकासपुरी, नवी दिल्ली, कस्तुरबा नगर, मालविआ नगर, छतरपूर, दिओली, संगम विहार, कालकजी, तुघलकाबाद, बादरपूर, लक्ष्मी नगर, क्रिष्णा नगर, शाहदरा, सीमा पुरी, रोहतास नगर, घोंडा, गोकालपूर, कारावाल नगर या अशा एकूण २३ मतदारसंघांमध्ये आपले उमेदवार दिले होते. पण या सर्व उमेदवारांचा दारुण पराभव (Defeat) झाला असून सगळ्या उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले आहे.

पक्षाला राष्ट्रीय दर्जा मिळविण्यासाठी करावा लागणार संघर्ष

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार) राष्ट्रीय दर्जासाठीच्या (National Standards) निकषात बसत नसल्याने आयोगाने त्यांचा तो दर्जा काढून घेतला होता. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सध्या राष्ट्रीय दर्जा नाही.आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तो दर्जा मिळवण्यासाठी पुन्हा प्रयत्न करत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे याआधी अरुणाचल प्रदेशमध्ये झालेल्या निवडणुकीत अनेक उमेदवार निवडून आले होते. यानंतर राष्ट्रवादीने दिल्ली विधानसभा निवडणुकीत आपले नशिब आजमावले. पंरतु, या निवडणुकीत त्यांचा दारुण पराभव झाला. त्यामुळे राष्ट्रवादीला राष्ट्रीय दर्जासाठी आता आणखी काही काळाची वाट पाहावी लागणार आहे.

राष्ट्रवादीच्या विभाजनानंतरची पहिलीच निवडणूक

राष्ट्रवादी काँग्रेसने यापूर्वी महाराष्ट्र (Maharashtra) बाहेरील राज्य निवडणुका लढवल्या आहेत. परंतु, दिल्लीत त्यांना फारसे यश मिळाले नाही. २०२० च्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत संयुक्त राष्ट्रवादी काँग्रेसने पाच जागा लढवल्या होत्या. मात्र, त्यातील एकही जागा त्यांना जिंकता आली नव्हती. तर जुलै २०२३ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विभाजन झाल्यावर स्वतंत्रपणे अजित पवारांनी लढवलेली ही दिल्लीतील पहिलीच निवडणूक आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Sanjay Raut : “२०१४ मध्ये युती तोडण्यास…”; राऊतांनी फडणवीसांची बाजू घेत...

0
नाशिक | Nashik महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) मागील दशकभरात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. दोन दशकांहून अधिक काळ सोबती असलेल्या भाजप आणि शिवसेना (BJP and...