Friday, May 3, 2024
Homeनाशिकबारा ज्योतिर्लिंग सायकल प्रवास; सीए कमल गोला यांची भ्रमंती

बारा ज्योतिर्लिंग सायकल प्रवास; सीए कमल गोला यांची भ्रमंती

नाशिक | प्रतिनिधी

दिल्ली येथील रहिवासी कमल गोला यांनी 11 नोव्हेंबर रोजी बारा ज्योतिर्लिंग सायकल यात्रेस सुरुवात केली होती…

- Advertisement -

व्यवसायाने चार्टर्ड अकाउंटंट असलेले कमल गोला यांना परदेशात स्थायिक असतांना सायकलची गोडी निर्माण झाली.

आपला देश सायकलवर जवळून बघावा तसेच कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर आपला स्वतःचा फिटनेस व पर्यावरणाचा समतोल राखावा या उद्देशाने त्यांनी 12 ज्योतिर्लिंगाचे दर्शन सायकल वर घेण्याचे ठरवले.

दिल्ली – कोलकाता-कन्याकुमारी- केरळ- कर्नाटक- गोवा महाराष्ट्र असा चार महिन्यात त्यांनी 9000 किलोमीटरचा सायकल प्रवास पूर्ण केला आहे.

सहा ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेऊन, त्यांचे काल नाशिक नगरीत आगमन झाले. नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनच्या वतीने पारंपारिक रित्या औक्षण करून, शाल, टोपी घालून स्वागत करण्यात आले.

याप्रसंगी नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनचे ज्येष्ठ उपाध्यक्ष चंद्रकांत नाईक, सचिव डॉ. मनिषा रौंदळ, खजिनदार रवींद्र दुसाने, साधना दुसाने, डॉ. नितीन रौंदळ ,राजेश्‍वर सूर्यवंशी हे उपस्थित होते.

गोला आज सकाळी त्र्यंबकेश्वर येथील ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी निघाले आहेत.त्रंबक राजाचे दर्शन घेऊन ते भीमाशंकरकडे रवाना होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या