Friday, May 3, 2024
Homeदेश विदेशदिल्ली पुन्हा हादरली! भरदिवसा कॉलेजच्या विद्यार्थिनीवर रॉडने हल्ला, पीडितेचा जागीच मृत्यू

दिल्ली पुन्हा हादरली! भरदिवसा कॉलेजच्या विद्यार्थिनीवर रॉडने हल्ला, पीडितेचा जागीच मृत्यू

दिल्ली । Delhi

दक्षिण दिल्लीतील मालवीय नगर (Malviya Nagar) भागात शुक्रवारी एका विद्यार्थिनीवर रॉडने हल्ला (Murder) केल्याने एका विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू झाला. ही तरुणी दिल्ली विद्यापीठाच्या कमला नेहरू कॉलेज (Kamala Nehru College) ची विद्यार्थिनी होती. हल्ल्यानंतर मुलीला रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र रुग्णालय प्रशासनाने तिला मृत घोषित केले. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. भरदिवसा घडलेल्या या घटनेने दिल्लीत खळबळ उडाली आहे.

- Advertisement -

पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मुलीचा मृतदेह ताब्यात घेतला असून तपास सुरु केला आहे. कॉलेज आणि आसपासच्या परिसरात पोलीस चौकशी करत आहेत. मृत मुलीचं कोणाबरोबर वैर होतं का, प्रेमसंबंधातून हत्या करण्यात आली आहे का, या दिशेने तपास सुरु आहे. आरोपीची ओळख पटवण्यासाठी परिसरातील सीसीटीव्हीदेखील तपासले जात आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कमला नेहरू कॉलेजमध्ये शिकणारी मुलगी आपल्या मित्राबरोबर कॉलेजच्या पार्कत आली होती. त्याचवेळी तिच्यावर कोणीतरी लोखंडी रॉडने हल्ला केला. या ठिकाणी कॉलेजमधले तरुण-तरुणी फिरायला येत असतात.

दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालिवाल यांनी विद्यार्थिनीच्या खून प्रकरणावरुन मोठी टीका केली आहे. दिल्लीत गुरुवारी रात्री महिलेची गोळीबार करुन हत्या करण्यात आली, आणि आज पुन्हा एका विद्यार्थिनीचा खून करण्यात आला. दिल्ली महिलांसाठी सुरक्षित नसल्याचा हल्लाबोलही स्वाती मालिवाल यांनी यावेळी केला.

- Advertisment -

ताज्या बातम्या