Friday, May 3, 2024
Homeदेश विदेशकहर झाला! रॉयल फॅमिलीतून आल्याचं सांगितलं अन् फाईव्ह स्टार हॉटेलला २३ लाखांना...

कहर झाला! रॉयल फॅमिलीतून आल्याचं सांगितलं अन् फाईव्ह स्टार हॉटेलला २३ लाखांना गंडवलं

दिल्ली | Delhi

आपण फसवणुकीच्या, चोरीच्या अनेक घटना पहिल्या असतील, आता राजधानी दिल्लीमध्येही (Delhi) फसवणुकीचे असेच एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे.

- Advertisement -

दिल्लीच्या लीला पॅलेस हॉटेलमध्ये (Leela Palace Hotel) चार महिन्यांहून अधिक काळ राहिल्यानंतर एक व्यक्ती बिल न भरताच फरार झाला आहे. मोहम्मद शरीफ असे त्या व्यक्तीच नाव आहे.

VIDEO : ‘ती’ कुत्र्यांना खायला देत होती, तितक्यातच…, थरकाप उडवणारा प्रकार कॅमेऱ्यात कैद

याबात मिळालेली माहिती अशी की, शरीफ गेल्या वर्षी १ ऑगस्ट ते २० नोव्हेंबर या कालावधीत हॉटेल लीला पॅलेसमध्ये थांबला होता. त्यानंतर अचानक तेथून कोणालाही न सांगता निघून गेला. तसेच हॉटेलच्या खोलीतून चांदीची भांडी व इतर वस्तू चोरल्या. त्याच्यावर हॉटेलचे २३ लाख रुपये थकीत आहेत.

शरीफ यांनी हॉटेल अधिकाऱ्यांना सांगितले की, तो संयुक्त अरब अमिरातीमध्ये राहतात. अबू धाबीच्या राजघराण्याचे सदस्य शेख फलाह बिन जायद अल नाहयान यांच्या कार्यालयात काम करतात. आरोपी हॉटेलच्या रुम क्रमांक ४२७ मध्ये ४ महिने राहिला आणि २० नोव्हेंबर २०२२ रोजी हॉटेलमधून मौल्यवान वस्तू घेऊन पळून गेला. त्याचे बिल सुमारे ३५ लाख झाल्याचे त्याने सांगितले.

नेपाळ विमान दुर्घटना : १६ वर्षांपूर्वी विमान अपघातात पती गेला, अन् आता ‘ती’ही…; दुर्दैवी योगायोग ऐकून सर्वांचेच डोळे पाणावले

मात्र त्याने हॉटेलवाल्यांना साडेअकरा लाख रुपये दिले होते. उर्वरित रक्कम त्याने भरली नाही. हॉटेल व्यावसायिकांना बनावट बिझनेस कार्ड, यूएई रहिवासी कार्ड आणि इतर कागदपत्रे सादर केल्याचे पोलिसांनी सांगितले. ज्यांची आता चौकशी सुरू आहे.

दिल्ली पोलिसांनी आरोपीविरुद्ध चोरी व फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. हॉटेल व्यवस्थापनाच्या तक्रारीवरून शनिवारी शरीफ याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

- Advertisment -

ताज्या बातम्या