Saturday, November 28, 2026
Homeब्रेकिंग न्यूजRohit Pawar: तेंव्हा नातं बाजूला ठेवून मी विचाराच्या बाजूने लढलो, आजही उद्याही...

Rohit Pawar: तेंव्हा नातं बाजूला ठेवून मी विचाराच्या बाजूने लढलो, आजही उद्याही तीच भूमिका..; रोहित पवारांचे सुचक ट्विट

मुंबई | Mumbai
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या डिलिमिटेशन विधेयकावरील भूमिकेमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. पवारांच्या या भूमिकेमुळे इंडिया आघाडीत फूट पडल्याचे बोलले जात आहे. तर दुसरीकडे या बिलावरून पवार गटातच दोन प्रवाह असल्याचं सांगितलं जात आहे. भाजप सोबत जाणे राष्ट्रवादीच्या या गटाला पचलेले नसल्याचे सांगितले जात आहे. असे असताना आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावर सूचक पोस्ट करत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ‘२०२२ मध्ये दादांनी वेगळा निर्णय घेतला, तेव्हा नातं बाजूला ठेवून मी विचारांच्या बाजूने लढलो. आजही आणि उद्याही तीच भूमिका कायम असेल’, असे म्हणत त्यांनी सत्तेत जाण्याच्या चर्चांवर अप्रत्यक्षपणे भाष्य केले आहे. त्यांच्या या पोस्टमुळे सत्तेसोबत जाण्याऐवजी विरोधात राहून संघर्ष करण्याच्या भूमिकेचे संकेत मिळत असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपली भूमिका बदलल्याने केंद्र सरकारचा संसदेत डिलिमिटेशन विधेयक मंजूर करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र, या मुद्द्यावरुन शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत दोन गट पडल्याचे दिसत आहे. एकीकडे सुप्रिया सुळे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डिलिमिटेशन बिलाला पाठिंबा देण्याच्या बाजूने असताना रोहित पवार (Rohit Pawar) यांनी त्याला विरोध केला आहे. (Delimitation Bill news) राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील अंतर्गत घडामोडींचा पार्श्वभूमीवर रोहित पवारांकडून भूमिका स्पष्ट करणारी पोस्ट सोशल मिडीयावरती शेअर केली आहे.

आदरणीय अजितदादांना जाऊन आज १० महिने पूर्ण झाले, परंतु अद्यापही त्यांच्या अपघात/घातपात प्रकरणाचा ना FIR झाला ना कुठला तपास झाला…. आभाळाएवढा माणूस गेला पण या घटनेच्या तपासाबाबत कुणालाही सोयरसुतक नाही. बहुतेकांनी सत्यापेक्षा सत्तेला महत्त्व दिल्याचं मी बघितले आणि बघतोय. पण काहीही झालं तरी दादांसाठीचा आणि जनतेसाठीचा आमचा लढा थांबणार नाही.

२०२२ मध्ये दादांनी वेगळा निर्णय घेतला, तेंव्हा नातं बाजूला ठेवून मी विचाराच्या बाजूने लढलो.आजही आणि उद्याही तीच भूमिका कायम असेल…!

#AjitdadaPawar— Rohit Pawar (@RRPSpeaks) November 28, 2026

- Advertisement -

तेंव्हा नातं बाजूला ठेवून मी विचाराच्या बाजूने लढलो, आजही आणि उद्याही तीच भूमिका कायम असेल
2022 साली अजित पवारांनी वेगळा निर्णय घेतला त्यावेळी देखील नातं बाजूला ठेऊन विचारांच्या बाजूने लढलो आणि आजही उद्याही तीच भूमिका कायम असल्याचे रोहित पवारांकडून स्पष्ट केले आहे. राजकीय वर्तुळात शरद पवारांची राष्ट्रवादी सत्तेसोबत जाऊ शकते अशा चर्चा असताना रोहित पवारांकडून मात्र सत्तेसोबत न जाता विरोधात राहून लढण्याचे सुतोवाच केले आहेत. आदरणीय अजितदादांना जाऊन आज १० महिने पूर्ण झाले, परंतु अद्यापही त्यांच्या अपघात/घातपात प्रकरणाचा ना FIR झाला ना कुठला तपास झाला. आभाळाएवढा माणूस गेला पण या घटनेच्या तपासाबाबत कुणालाही सोयरसुतक नाही. बहुतेकांनी सत्यापेक्षा सत्तेला महत्त्व दिल्याचं मी बघितले आणि बघतोय. पण काहीही झालं तरी दादांसाठीचा आणि जनतेसाठीचा आमचा लढा थांबणार नाही. 2022 मध्ये दादांनी वेगळा निर्णय घेतला, तेंव्हा नातं बाजूला ठेवून मी विचाराच्या बाजूने लढलो.आजही आणि उद्याही तीच भूमिका कायम असेल, असेही पुढे रोहित पवारांनी म्हटले आहे.

Amol Kolhe: सुप्रिया सुळेंनी इंडिया आघाडीच्या बैठकीला दांडी का मारली? खासदार कोल्हेंनी दिली माहिती, म्हणाले, काँग्रेसच्या नेत्यांकडून…

रोहित पवार हे भाजपसोबत न जाण्याच्या भूमिकेवर ठाम आहे. मात्र, शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील इतर शिलेदार सत्तेत जाण्यास उत्सुक असल्याची माहिती आहे. भविष्यात शरद पवारांची राष्ट्रवादी भाजपसोबत सत्तेत सामील होऊ शकते. त्या मोबदल्यात त्यांना केंद्रात आणि राज्यात महत्त्वाची मंत्रीपदं मिळू शकतात, अशी जोरदार चर्चा आहे. मात्र, रोहित पवार यांनी तसे घडल्यास वेगळी वाट निवडण्याचे संकेत सातत्याने दिले आहेत.पक्ष मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला पाठिंबा देताना सत्तेसोबत जाऊ शकतो या माध्यमात सुरू असलेल्या चर्चाच्या पार्श्वभूमीवर पोस्ट चांगलीच चर्चेत आली आहे.

ताज्या बातम्या

सुप्रिया

Amol Kolhe: सुप्रिया सुळेंनी इंडिया आघाडीच्या बैठकीला दांडी का मारली? खासदार...

0
पुणे | Puneमतदारसंघ पुनर्रचना अर्थात डिलिमिटेशन विधेयकाच्या पार्श्वभूमीवर लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या विरोधी पक्षाच्या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार...