Friday, May 3, 2024
Homeनाशिकनांदुरी रस्त्यावर गतिरोधक बसविण्याची मागणी

नांदुरी रस्त्यावर गतिरोधक बसविण्याची मागणी

नांदुरी । वार्ताहर | Nanduri

नांदुरी (nanduri) गावातील रस्त्यावर नव्याने झालेले सिमेंट रोड (Cement Road) व डांबरीकरणाने (Asphalting) गुळगुळीत झालेल्या रस्त्यावर वाहानांची गती बघून रस्त्यालगत असणार्‍या दुकानदारांसह पायी जाणार्‍या येणार्‍यांच्या मनात धास्ती बसते. त्यामुळे येथे गतिरोधक (speed breaker) बसविण्यात यावे, अशी मागणी व्यावसायिकांनी व नागरिकांनी केली आहे.

- Advertisement -

नांदुरी बसस्थानक (Nanduri bus stand) ते नांदुरी पोलिस चौकी (Nanduri Police Station) हे अर्धा किलोमीटरचे अंतर काही क्षणात वाहनधारक पार करतांना दिसतात वाहनधारकांना गाव आहे की नाही याचेच भान राहत नाही. डांबरीकरण करुन चार दिवस झाले त्यात दुचाकी स्वरांचा दोन किरकोळ स्वरुपात अपघात झाले. वाहनांचा प्रचंड वेग असतो. नांदुरी गावातल्या मध्यवर्ती ठिकाणाहुन उताराच्या बाजुनेच अभोणा गावाकडे वळण रस्ता आहे.

दुसर्‍या बाजुने सप्तशृंग देवीचे पहिल्या पायरीला मंदिर व जिल्हा परिषदेची शाळा (Zilha Parishad School), दवाखाना व रानात जनावरे चारण्यासाठी याच रस्त्यावरून जनावरे गुराखी घेऊन जातात. त्यामुळे माणसांची व दुभत्या जनावरांसह लहान कालवडांनाही रस्ता ओलांडायला मोठी कसरत करावी लागते. या दोन्ही रस्त्याना वळण घेऊनच जावे लागते. रस्ता मोठा असल्याने वाहनांचा प्रचंड वेग व गुळगुळीत रस्ता असल्याने वळण घेणार्‍या वाहनचालकांना तर सावाधगिरीच बाळगावी लागते. या रस्त्याला दुभाजक (Road divider) नसल्याने वाहनधारक बेसिस्तपणे वाहन पास करतांना दिसतात.

हॉटेल व इतर व्यवसाय ररस्त्यालगतच असल्याने काही नागरिक व भाविकभक्त आपले वाहन रस्त्याच्या कडेला थांबवुन हॉटेल जेवनासाठी जात असतात. पण थांबलेल्या वाहधचालकाचा जिव आर्धा जेवणाकडे व अर्धा वाहनाकडे असतो. अशा प्रकारे अनेकदा लहान मोठे अपघात या आगोदर घडले असुन काहिंना आपला जीवही गमवावा लागला आहे. त्यामुळे येथे गतिरोधक बसविण्यात यावे, अशी मागणी होत आहे.

नांदुरी बसस्थानक ते पोलिस चौकी या उताराच्या रस्त्यावर वाहनांची गती काळजाचा ठोका वाढवते. लहान बालकांसह अबालवृद्धांची रस्ता ओलांडातना तारांबळ उडते त्यासाठी गावात महत्त्वाच्या ठिकाणी गतिरोधक बसविणे महत्वाचे आहे.

– गणेश दळवी, हॉटेल व्यावसायिक, नांदुरी

या राज्य महामार्ग असलेल्या रस्त्यावर गतिरोधक नसल्यामुळे शाळेत जाणार्‍या विद्यार्थ्यांना व दवाखान्यात उपचार करण्यासाठी जाणार्‍या व्यक्तींना रस्ता ओलांडण्यासाठी काहीकाळ उभे रहावे लागते. रस्त्यांच्या एका बाजुला किराणा दुकाणे असल्याने किराणा माल घेण्यासाठी जिव मुठीत धरुन रस्ता ओलाडांवा लागतो. सार्वजनिक बांधकाम विभागाने चैत्रउत्सवाच्या आत या रस्त्यावर गतिरोधक बसवावे.

- Advertisment -

ताज्या बातम्या