Friday, May 3, 2024
Homeनाशिकगंगापूर डावा कालव्याला पाणी सोडण्याची मागणी

गंगापूर डावा कालव्याला पाणी सोडण्याची मागणी

खेरवाडी। वार्ताहर | Kherwadi

गेल्या दीड महिन्यापासून गंगापूर डाव्या कालव्याला (Gangapur left canal) पाणी न सोडल्यामुळे शेतातील उभी पीके जळू लागली असून

- Advertisement -

ज्या शेतकर्‍यांच्या द्राक्षबागा (Vineyard) खाली झाल्या आहेत अशा बागांना पाण्याची गरज असल्याने पाटबंधारे विभागाने (Irrigation Department) गंगापूर डावा तट कालव्याला तत्काळ पाणी सोडावे अशी मागणी खेरवाडी (kherwadi), दीक्षी (dikshi), सुकेणा (sukena) परिसरातील शेतकर्‍यांनी (farmers) केली आहे.

सध्या उन्हाची तीव्रता दिवसागणिक वाढत असून वाढते विजभारनियमनामुळे शेतातील उभी पीके पाण्याविना जळू लागली आहे. अशा वेळी शेतकर्‍यांना आता गंगापूर डाव्या कालव्याचाच आधार दिसू लागला आहे. पाटबंधारे विभागाने गेल्या दीड महिन्यांपूर्वी गरज नसतांना देखील त्यावेळी कालव्याला पाणी सोडले होते. मात्र आता पिकांना पाण्याची आवश्यकता असल्याने तत्काळ पाणी सोडणे गरजेचे आहे. परिसरात सर्वाधिक क्षेत्रावर द्राक्षबागा असून जवळपास 70 टक्के बागा खाली झाल्या आहेत.

त्यामुळे अशा वेळी या बागांना पाणी देण्याची आवश्यकता असते. बागांबरोबरच उन्हाळ कांदा (summer onion), भाजीपाला (Vegetables) आदी पीके अवघ्या एका पाण्यावर आली असतांनाही या पिकांना पाणी देता येत नाही. त्यामुळे गंगापूर कालव्याला पाणी सोडून या कालव्याच्या चार्‍यांना तत्काळ पाणी सोडण्यात यावे. त्यासाठी लोकप्रतिनिधी, स्थानिक नेते यांनी पाटबंधारे विभागाचे अधिकार्‍यांना तशा सूचना द्याव्यात अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या