Friday, May 3, 2024
Homeनाशिकएसटी कामगारांचे थकीत वेतन त्वरित अदा करा

एसटी कामगारांचे थकीत वेतन त्वरित अदा करा

नाशिक । प्रतिनिधी Nashik

करोना संकटात एसटी कर्मचारी जीव धोक्यात घालून सेवा बजावत आहे. मात्र मागील आॅगस्ट महिन्यांपासूनचे कर्मचार्‍यांचे वेतन अदा करण्यात आले नसून आता दिवाळीसण तोंडावर आला आहे.

- Advertisement -

तरी देखील वेतन देण्याबाबत कोणताही निर्णय होत नाही. त्यामुळे कर्मचारी व त्यांच्या कुटूंबावर उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे. शासनाने त्वरित हा प्रश्न सोडवून प्रलंबित वेतनाचा प्रश्न मार्गी लावावा या मागणीचे निवेदन महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेतर्फे निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे यांना देण्यात आले. वेतन न मिळाल्यास एसटी कर्मचारी आपल्या कुटुंबियासह त्यांच्या घरासमोर आंदोलन करतील असा इशारा संघटनेकडून देण्यात आला.

अतिशय प्रतिकूल परिस्थितीत एसटी कर्मचारी सेवा बजावत आहे. करोनाची लागण झाल्याने ७४ हून अधिक एसटी कर्मचार्‍याचा मृत्यू झाला आहे. करोनासारख्या जिवघेण्या संकटात सेवा देत असूनही कर्मचार्‍याचे मागील आॅगस्ट महिन्यापासूनचे वेतन थकले आहे. शासकिय कर्मचार्‍याप्रमाणे एसटि कर्मचार्‍यांना महागाई भत्ता व सण उचल देण्याचे कामगार करारान्वये मान्य केले आहे.

मात्र एसटी महामंडळाने दिवाळी सण तोंडावर आला असताना कामगाराना अद्याप १२ हजार ५०० रुपयांची सण उचल लागू केली नाही. वेतन वेळेवर मिळत नसल्याने कर्मचार्‍यांमध्ये प्रचंड असंतोष आहे. दोन महिन्याचे वेतन, दिवाळी सणाची उचल रक्कम व महागाई भत्ता त्वरीत दिला जावा अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट संघटनेकडून या मागणीकडे लक्ष वेधण्याsaसाठी जिल्हाधिकारी व तहसिलदारांना राज्यभर निवेदन देण्यात आले. शासनाने तरी देखील दखल न घेतल्यास ९ नोव्हेंबरला कर्मचारी व कामगार त्यांच्या राहत्या घरापुढे आक्रोश आंदोलन करतील असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. यावेळि संघटनेचे नेते विजय पवार यांसह पदाधिकारी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या