Friday, May 3, 2024
Homeनाशिकपंचवटी एक्सप्रेससाठी कुंदेवाडी बस सुरू करण्याची मागणी

पंचवटी एक्सप्रेससाठी कुंदेवाडी बस सुरू करण्याची मागणी

पिंपळगाव ब.। प्रतिनिधी | Pimpalgaon Basvant

पिंपळगाव (Pimpalgaon Basvant) परिसरातील नागरिकांना मुंबई (mumbai) येथे ये-जा करण्यासाठी निफाड रेल्वे स्टेशन (Niphad railway station) सोयीचे असल्याने पिंपळगाव आगाराने सकाळच्या आणि रात्रीच्या पंचवटी एक्सप्रेससाठी (Panchavati Express) बससेवा (Bus service) सुरू करावी अशी मागणी पिंपळगाव शहर भाजपच्या (bjp) वतीने करण्यात आली आहे.

- Advertisement -

निफाड रेल्वे स्टेशनवरून सकाळी 6.15 वाजता पंचवटी एक्सप्रेस ही मुंबईला जाते. ती साडेतीन ते चार तासात मुंबई व्ही.टी. स्टेशनला (V.T. Station) पोहचते. साधारणत: 10.30 वाजता प्रवाशी मुंबईत पोहचातात. त्यामुळे मंत्रालय व इतर ठिकाणच्या शासकीय कार्यालयातील कामे, व्यापारी व व्यवसायिकांना त्यांचे खरेदीचे सारे व्यवहार पूर्ण करता येतात. मुंबई (mumbai) येथील वैद्यकीय क्षेत्रातील निष्णात डॉक्टरांच्या भेटी व तपासण्या करण्यासाठी मोठ्या प्रमाणात पिंपळगाव बसवंत ((Pimpalgaon Basvant)) सह परिसरातील नागरिक जात येत असतात.

सायंकाळी 5 वाजेपर्यंत सर्वांची कामे, भेटी पूर्ण होवून सांयकाळी 6 ते 6.30 वाजता मुंबई व्ही.टी. स्टेशनवरून पुन्हा पंचवटी एक्स्प्रेसने रात्री 11 वाजेपर्यंत निफाड येथे येता येते. या पंचवटी एक्स्प्रेसला (Panchavati Express) समांतर सकाळी निफाड रेल्वे स्टेशनवर पोहोचण्यासाठी व रात्री निफाड स्टेशन वरून पिंपळगाव बसवंत येथे येण्यासाठीची बस सेवा करोना (corona) नंतर अद्याप सुरू झाली नसून ती पूर्ववत सुरु करावी अशा आशयाची मागणी करणारे निवेदन (memorandum) पिंपळगाव बसवंत भाजप च्या वतीने पिंपळगाव बसवंत डेपो प्रमुख यांना देण्यात आले.

पिंपळगाव बसवंत, कुंदेवाडी (निफाड) रेल्वे स्टेशन बस सेवा त्वरित सुरु करावी अन्यथा आम्हाला आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल अशा आशयाचे निवेदन देण्यात आले. निवेदनावर भाजपचे जिल्हा चिटणीस सतीश मोरे, किसान मोर्चाचे बापूसाहेब पाटील, भाजपचे अल्पसंख्याक सेलचे प्रदेश सचिव अल्पेश पारख, शहर अध्यक्ष प्रशांत घोडके, प्रा.लक्ष्मण मोरे, प्रकाश घोडके, संदीप झुटे, राहूल सोनवणे, किशोर कापसे आदींसह नागरिकांच्या सह्या आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या