Friday, May 3, 2024
Homeजळगावलिपीकाची अडीचवर्षापूर्वी बदली होऊनही कपाटाच्या चाब्या देईना...

लिपीकाची अडीचवर्षापूर्वी बदली होऊनही कपाटाच्या चाब्या देईना…

जळगाव – Jalgaon – प्रतिनिधी :

जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागातील एका लिपीकाची अडीचवर्षापूर्वी बदली होती. मात्र, अजूनपर्यंत त्या लिपीकाने संबंधित लिपीकाला कपाटाच्या चाब्या दिल्या नसल्याचा धक्कादायकप्रकार समोर आला आहे.

- Advertisement -

याप्रकरणी माध्यमिक शिक्षणाधिकारी बी.जे. पाटील यांनी कोणतीही कारवाई केली. त्यामुळे माध्यमिक शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.

जळगाव जिल्हा परिषदेचा माध्यमिक शिक्षण विभाग सध्या शिक्षकांच्या बोगस मान्यता व बदल्यांच्या प्रकरणांवरून चौकशीच्या फेर्‍यात सापडला असून नाशिकचे शिक्षण उपसंचालकांकडून माध्यमिक शिक्षण विभागातील बोगस नियुक्त्या आणि मान्यताविषयी चौकशी सुरू झाली आहे.

शिक्षण विभागातील एकापाठोपाठ एक-एक प्रकरण चव्हाट्यावर येत आहे. तरी देखील या विभागाचा भोंगळ कारभार अजूनही कमी होतांना दिसत नाही. एका लिपीकाची अडीच वर्षापुर्वीेच वेतन युनीटला बदली झाली.

मात्र, त्याच्याकडील पदभार त्यांनी बदलीच्या ठिकाणी आलेल्या लिपीकाकडे दिला नाही. तसेच कामकाजाचे सर्वदस्तावेज भरलेल्या कपाटाच्या चाव्या देखील त्यांनी दिल्या नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

माध्यमिक शिक्षण विभागाचे रवींद्र घोंगे या वरिष्ठ लिपीकाची अडीच वर्षापूर्वीच वेतन युनिटला बदली झालेली आहे. त्यांच्या जागी वेतन युनीटचे योगेश खोडपे यांची बदली माध्यमिक शिक्षण विभागात झाली आहे.

मात्र, खोडपे यांना पदभारही दिला नाही आणि कपाटाच्या चाव्या देखील दिल्या नसल्याचा प्रकार घडला आहे.

अडीच वर्षापासून हा प्रकार सुरू असतांना माध्यमिक शिक्षणाधिकारी बी.जे.पाटील यांनी देखील याप्रकरणी कुठली ही दखल घेतली नसल्याने विना दस्तावेज, विना फाईलींचे कामकाज सुरू असल्याचे दिसून येत आहे.

माध्यमिक शिक्षणाधिकार्‍यांनी त्या लिपीकावर कारवाई न करता चुप्प साधल्याने शिक्षण विभाग वादाच्या भोवर्‍या सापडला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या