Friday, May 3, 2024
Homeनगरअहमदनगर मर्चंन्टस बँकेत 135 कोटींपेक्षा अधिक ठेवी

अहमदनगर मर्चंन्टस बँकेत 135 कोटींपेक्षा अधिक ठेवी

अहमदनगर (प्रतिनिधी) –

कोविड महामारीमुळे आर्थिक फटका बसल्याने बॅकिंग व्यवसायावर परिणाम होऊनही अहमदनगर मर्चंन्ट बँकेच्या

- Advertisement -

ठेवीत वाढ होवून 135 कोटींपेक्षा अधिक ठेवी जमा झाल्या आहे. 2019-20 या आर्थिक वर्षात बँकेला 21 कोटींचा ढोबळ तर 8 कोटींचा निव्वळ नफा झाल्याची माहिती बँकेचे चेअरमन आनंदराम मुनोत यांनी सर्वसाधारण सभेत दिली.

मर्चंन्ट बँकेची सर्वसाधारण सभा काल मंगळवारी ऑनलाईन पध्दतीने झाली. या सभेत चेअरमन मुनोत यांनी ताळेबंद सादर केला. संस्थापक संचालक हस्तीमल मुनोत, अजय मुथा, मीनाताई मुनोत, अनिल पोखरणा,उपाध्यक्ष सुभाष बायड सभेला उपस्थित होते.

तारकपूर शाखेसाठी आयएसओ
बँकेच्या कामकाजात सुसूत्रता येण्यासाठी व कर्मचार्‍यांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी आयएसओ 9001 चे मानांकन प्राप्त करण्यासाठी बँकेने तारकपूर शाखेची निवड केली आहे. लॉकडाऊनमुळे त्याचे काम काही काळ थांबले, मात्र आता ते प्रगतीपथावर आहे. तारकपूर शाखेला आयएसओ 9001 चे सर्टिफिकेट मिळाल्यानंतर बँकेच्या इतरही शाखांसाठी हे सर्टिफिकेट मिळविण्याची कार्यवाही केली जाईल असे चेअरमन मुनोत यांनी सांगितले.

कॅशलेसमधून वेळेची बचत
बँकेने सभासद, खातेदार, व्यापार्‍यांना कॅशलेस व्यवहार करण्यासाठी नेट बॅकिंग, क्युआर कोडद्वारे ऑनलाईन पेमेंट, गुगल पे, फोन पे, भीम अ‍ॅप अशा सेवा उपलब्ध करून दिल्या. ई पासबुक, ई स्टेटमेंट, आरटीजीएस, ई स्टॅपिंग, मोबाईल बॅकिंग, भारत ब्सि पेमेंट, आयएमपीएस अशा सुविधा उपलब्ध करून दिल्या. त्यातून वेळेची बचत झाली. सभासदांनी बँकेत फॉर्म भरून दिल्यानंतर त्यांना ई मेलवर महिनाभराचे स्टेटमेंट पाठविले जाते. त्याचा लाभ घेण्याचे आवाहन चेअरमन मुनोत यांनी केले.

135 कोटींपेक्षा अधिक ठेवी

कर्जही 72 कोटीने वाढले
भागभांडवल 20 कोटी
राखीव, इतर निधी 145 कोटी
एसएलआर गुंतवणूक 227 कोटी
मुदत ठेवी 290 कोटी
डिझीटलायझेशनकडे वाटचाल

- Advertisment -

ताज्या बातम्या