Friday, May 3, 2024
HomeनाशिकDeshdoot News Impact : स्वच्छता मोहीमेस प्रारंभ

Deshdoot News Impact : स्वच्छता मोहीमेस प्रारंभ

दे. कॅम्प । वार्ताहर Deolali Camp

येथील कॅन्टोन्मेंट वॉर्ड क्रमांक 8 ( Deolali Cantonment Ward No. 8 ) मधील विजयनगर ( Vijay Nagar )भागांत साचलेल्या पाण्यामुळे घाणीचे साम्राज्य निर्माण होऊन नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होत असल्याने प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे, अन्यथा येथील नागरिकांना कार्यालयावर मोर्चा काढावा लागेल, असा इशारा देणारे वृत्त देशदूतमध्ये प्रसिद्ध ( Deshdoot News Impact )होताच दुसर्‍याच दिवशी आरोग्य विभागाने त्याची दखल घेऊन कार्यवाही करीत साफसफाईसह औषध फवारणी केली.

- Advertisement -

वॉर्ड क्र 8 मधील विजयनगर येथील दोनवाडे रोडवरील न्यू पंचरत्न सोसायटी जवळील परिसरात घाणीच्या व दुर्गंधीयुक्त पाण्याचे डबके साचल्याने येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून नागरिकांच्या आरोग्याचा महत्त्वाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासन येथील नागरिकांच्या जीवाशी खेळत असल्याचा आरोप येथील नागरिकांनी केला होता. शिवाय आरोग्य विभागाचा एकही अधिकारी या भागाकडे फिरकत नसल्याने याबाबत देशदूतने प्रकाशझोत टाकला असता, अवघ्या चोवीस तासात आरोग्य विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.

याशिवाय कॅन्टोन्मेंट बोर्डाचे माजी उपाध्यक्ष तानाजी करंजकर यांनीदेखील अधिकारी व कर्मचारी यांना समस्येचे निराकरण तातडीने करणे बाबत सूचना केल्या. अवघ्या काही तासातच येथील साचलेल्या पाण्याची मार्ग काढून देताना तेथे जंतुनाशक पावडरची फवारणी करण्यात आली. आरोग्याच्या समस्याबाबत उठवण्यात आलेला आवाज व प्रशासनाने घेतली दखल याबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या