Saturday, November 14, 2026
Homeब्रेकिंग न्यूज'देशदूत पंचवटी प्रॉपर्टी एक्स्पो'ला शानदार सुरुवात

‘देशदूत पंचवटी प्रॉपर्टी एक्स्पो’ला शानदार सुरुवात

पहिल्याच दिवशी नागरिकांचा उदंड प्रतिसाद

- Advertisement -

नाशिक । प्रतिनिधी Nashik

उत्तम दर्जा, सुयोग्य स्थान, भरपूर सुविधा आणि वाजवी मूल्य या चतु:सूत्रीचा संगम साधलेल्या गृहप्रकल्पांचा अंतर्भाव असलेल्या ‘देशदूत’ आयोजित तसेच ‘हर्षल हणमंते बिल्डर्स अँड डेव्हलपर्स प्रा. लि.’ प्रायोजित सहप्रयोजक सुमित बिल्डकॉन ‘पंचवटी प्रॉपर्टी एक्स्पो २०२५’ प्रदर्शनाचा शानदार शुभारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला.

बँक ऑफ महाराष्ट्रचे विभागीय व्यवस्थापक राजेश देशमुख, क्रेडाई नाशिक मेट्रोचे अध्यक्ष गौरव ठक्कर, मनोज खिवसरा, तुषार संकलेचा, हर्षल हणमंते बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे संचालक हर्षल हणमंते, सुमित बिल्डकॉनचे संचालक सुमित चौधरी आदी मान्यवरांच्या उपस्थितीत फीत कापून एक्स्पोचे उदघाटन करण्यात आले. यानंतर दीपप्रज्वलन करून कार्यक्रम सुरू झाला. ‘देशदूत’चे सल्लागार संपादक शैलेंद्र तनपुरे यांनी प्रास्ताविक केले.

पहिल्याच दिवशी प्रदर्शनाला नागरिकांचा उदंड प्रतिसाद लाभला. प्रदर्शनाचे आयोजन पंचवटी येथील एस. एल. के. प्रॉपर्टीज, राज स्वीट्ससमोर, आरटीओ कॉर्नर, दिंडोरी रोड येथे करण्यात आले आहे. त्यात नामांकित बांधकाम व्यावसायिकांचे ३० स्टॉल्स उभारण्यात आले आहेत. मान्यवरांनी प्रदर्शन आयोजनाबाबत सामान्य नागरिक व बांधकाम व्यावसायिक यांच्यात विश्वासार्हतेचा सेतू निर्माण करणाऱ्या ‘देशदूत’ परिवाराचे कौतुक केले. तसेच स्टॉलला भेट देत स्टॉलधारकांशी संवाद साधला.

प्रदर्शन येत्या रविवारपर्यंत (दि. १६) दुपारी २ ते रात्री ९ या वेळेत सर्वांसाठी खुले राहणार आहे. गृहस्वप्नपूर्तीसाठी नागरिकांनी भेट द्यावी, देण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. पहिल्याच दिवशी नागरिकांनी मोठ्या संख्येने भेट देऊन प्रदर्शनाच्या आयोजनाबद्दल समाधान व्यक्त केले. याप्रसंगी रचिता कन्स्ट्रक्शनचे संचालक प्रसन्न सायखेडकर, मोहाडकर ऍड एजन्सीचे धनंजय मोहाडकर ‘देशदूत’चे सहायक जाहिरात महाव्यवस्थापक मिलिंद वैद्य, उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मार्केटिंग ऑफिसर समीर पाराशरे, भगवंत जाधव, आनंद कदम, प्रशांत अहिरे, विशाल जमधडे, यांनी परिश्रम घेतले. वितरण व्यवस्थापक पराग पुराणिक यांनी सूत्रसंचालन केले तर आभार जाहिरात महाव्यवस्थापक अमोल घावरे यांनी मानले.

‘देशदूत’ प्रॉपर्टी एक्स्पोचे मुख्य प्रायोजक नाशिककरांचे ३७ वर्षांपासून असलेले फॅमिली बिल्डर हर्षल हणमंते बिल्डर्स अँड डेव्हलपर्स प्रा. लि., सहप्रयोजक सुमित बिल्डकॉन, फायनान्शिअल पार्टनर बँक ऑफ महाराष्ट्र तर, पर्यावरणीय पार्टनर पपायाज नर्सरी आहेत. १६ नोव्हेंबर पर्यंत दररोज दुपारी २ ते रात्री ९ वाजेपर्यंत सर्वांना प्रवेश खुला आहे. नागरिकांनी ‘देशदूत’ आयोजित पंचवटी प्रोपर्टी एक्स्पोला अवश्य भेट द्यावी असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

विभागीय एक्स्पोच्या माध्यमातून त्या-त्या भागातील बांधकाम प्रकल्पांची परीपूर्ण माहिती मिळते. घर व त्यासंबंधीचे पूरक पर्याय या प्रदर्शनाच्या माध्यमातून एकाच छताखाली उपलब्ध असल्याने गृहस्वप्नपूर्तीची प्राथमिकता शक्य झाली आहे. ‘देशदूत’ने घेतलेला पुढाकार कौतुकास्पद आहे.
गौरव ठक्कर

    गेल्या तीन वर्षांपासून आम्ही देशदूतचे प्रायोजक आहोत. विभागीय प्रदर्शनाचा फायदा ग्राहक व बांधकाम व्यावसायिक दोघांनाही होतो. दिंडोरीरोड परिसराला भविष्यात अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त होणार आहे. त्यामुळे या ठिकाणी कोणत्याही स्वरूपात प्रॉपर्टी घेतल्यास त्याचा नक्की फायदा ग्राहकांना होणार आहे. देशदूतने प्रदर्शनाचे आयोजन अतिशय उत्तम प्रकारे केले असून, नागरिकांनी त्याचा जरूर फायदा घ्यावा.
    -हर्षल हणमंते

    अनेक बांधकाम व्यावसायिकांना व्यासपीठ मिळाले असून, हक्काचे घर घेणाऱ्या नागरिकांना यानिमित्ताने उत्तमोत्तम आणि बजेटनुसार घर निवडण्याची संधी प्राप्त झाली आहे. ग्राहकांना या प्रदर्शनाचा नक्कीच फायदा होणार आहे. देशदूतच्या माध्यमातून होणारा हा उपक्रम प्रशंसनीय असा आहे.
    सुमित चौधरी

    नाशिक शहराची प्रगती वेगाने होत आहे. शिवाय शहराला रस्ते, रेल्वे व हवाई मार्गाची उत्तम कनेक्टिव्हिटी असल्याने अनेक नागरिक बाहेरून येथे राहण्यासाठी व गुंतवणुकीसाठी पसंती देत आहेत. त्यामुळे घरांची मागणी वाढत चालली आहे. एक्स्पोच्या माध्यमातून सर्व स्तरातील ग्राहकांना घर व व्यावसायिक प्रकल्प घेण्याची संधी उपलब्ध झाली आहे त्याचा निश्चितच ग्राहकांनी फायदा घ्यावा.
    राजेश देशमुख

    ताज्या बातम्या

    पडसाद : नाशिकचा श्वास गुदमरतोय…

    0
    नाशिक | शैलेंद्र तनपुरे - दै. 'देशदूत' - संपादक दिवाळी हा प्रकाशाचा, आनंदाचा आणि उत्साहाचा सण. पण अलीकडच्या काही वर्षांत या सणाचे स्वरूप बदलले आहे....