Thursday, March 13, 2025
Homeनाशिक‘देशदूत दिंडोरी दर्पण’ पुरस्कार घोषित; उद्या वितरण

‘देशदूत दिंडोरी दर्पण’ पुरस्कार घोषित; उद्या वितरण

दिंडोरी । प्रतिनिधी Dindori

तालुक्यातील विविध क्षेत्रांत काम करणार्‍या गुणवंतांना दैनिक ‘देशदूत’कडून दिल्या जाणार्‍या ‘देशदूत दिंडोरी दर्पण’ पुरस्कारांची घोषणा आज निवड समितीने केली. उद्या शुक्रवारी (दि.14) सायंकाळी 5 वाजता प्रसिद्ध हास्य कलाकार सागर कारंडे यांच्या हस्ते या गुणवंतांना पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे.

- Advertisement -

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

देशदूत दिंडोरी कार्यालयाच्या वर्धापनदिनानिमित्त दरवर्षी विविध क्षेत्रांत काम करणार्‍या व्यक्तींच्या कार्याचा गौरव व्हावा व त्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी ‘देशदूत दिंडोरी दर्पण’ पुरस्कार दिला जातो. यावर्षी घोषित झालेल्या पुरस्कारांर्थींमध्ये प्रकाश शिंदे (उत्कृष्ट समाजकारण; कृषीक्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी ), विष्णुपंत पाटील (जीवनगौरव), रंजीत देशमुख (उत्कृष्ट सामाजिक कार्यकर्ता), सुमित चोरडिया (यशस्वी उद्योजक), सचिन बर्डे (कृषीक्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी ), कमलेश बोरस्ते (यशस्वी उद्योजक), दीपक धुमणे (यशस्वी उद्योजक), किरण तिवारी (उत्कृष्ट कार्यकर्ता), अनिल आव्हाड ( यशस्वी उद्योजक )गुरुकुल इंटरनॅशनल स्कूलचे संचालक अमोल देशमुख, सोमनाथ सोनवणे (उत्कृष्ट शिक्षण संस्था ), डी. जे. पलटनचे संचालक धनंजय जाधव, राहुल पगार, भगवान डंबाळे (उत्कृष्ट विद्यार्थी घडवणारी संस्था), प्रभाकर वडजे( उत्कृष्ट समाजकारण) , मच्छिंद्र कोंड (कृषीक्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी ), माणिक महाराज राऊत( उत्कृष्ट कीर्तनकार), रवींद्र मोरे(उत्कृष्ट शेती आणि उद्योजक), शाहू सुनील शेटे(कृषीक्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी ), प्रतीक मधुनाना जाधव(उत्कृष्ट उद्योजक आणि कृषी क्षेत्रात कामगिरी ), गुलाब चौधरी (उत्कृष्ट उद्योजक ) यांचा समावेश आहे.

उत्कृष्ट प्रशासकीय अधिकारी म्हणून धीरज भामरे, वैशाली बागुल, रोहिणी काथापुरे, वनिता चौधरी, रामदास गायखे यांना पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. पुरस्कार वितरण समारंभ उद्या (दि.14) दिंडोरी येथील राजे बँक्वेट हॉल येथे सायंकाळी 5 वाजता ‘चला हवा येऊ द्या फेम’ प्रसिद्ध हास्य कलाकार सागर कारंडे यांच्या हस्ते व कॅबिनेट मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन ‘देशदूत’ने केले आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik News : कृष्णा आंधळे नाशकात दिसला? दीड महिन्यांनी पुन्हा नागरिकांचा...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik बीड जिल्ह्यातील (Beed District) मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतील मुख्य संशयित कृष्णा आंधळे (Krishna Andhale) तीन महिन्यांपासून...