Friday, April 25, 2025
HomeराजकीयDevendra fadnavis : "…तर इतका गहजब का?"; 'त्या' इफ्तारचा फोटो शेअर करत...

Devendra fadnavis : “…तर इतका गहजब का?”; ‘त्या’ इफ्तारचा फोटो शेअर करत फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल

मुंबई | Mumbai

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या घरी जावून गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं. त्यांच्या भेटीचा फोटो आणि व्हिडीओ समोर आला आहे. पण त्यावरुन राजकारण तापताना दिसत आहे. पंतप्रधानांनी सरन्यायाधीशांच्या घरी गणपतीला जाणं हे अपेक्षित नसल्याची टीका विरोधकांकडून केली जात आहे.

- Advertisement -

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी यावरुन सडकून टीका केलीय. तसेच राज्यातील आमदार अपात्रतेच्या प्रकरणावरुनही संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्यावर निशाणा साधला. दरम्यान भाजपा नेतेही विरोधकांच्या टीकेचा खरपूस शब्दांत समाचार घेत आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही याबाबत सडेतोड शब्दांत विरोधकांना विचारणा केली आहे.

हे ही वाचा : विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी किती जागा जिंकणार? काँग्रेसच्या नेत्याने थेट आकडाच…

देवेंद्र फडणवीस यांनी एक्सवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा फोटो शेअर करत विरोधकांवर पलटवार केला आहे. या पोस्टमध्ये देवेंद्र फडणवीस म्हणतात की, गणेशोत्सवाची देशभरात सर्वत्र धूम आहे. आस्थेने गणरायाचे पूजन केले जात आहे. गौरी-गणपतीतील महालक्ष्मी पूजन सुद्धा होते. देशाचे सरन्यायाधीश न्या. धनंजय चंद्रचूड यांच्याकडे पंतप्रधानांनी गणरायाची आरती केली आणि महालक्ष्मी पूजन सुद्धा केले. सरन्यायाधीश महाराष्ट्रातील आहेत. दिल्लीत खास महाराष्ट्रीयन व्यक्तीकडूनच ते दरवर्षी गणरायाची मूर्ती पूजेसाठी आणतात, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

पण अचानक इकोसिस्टीम अशी कार्यान्वित झाली की, जणू आभाळ कोसळले. फरक फक्त इतकाच आहे की, आधीचे पंतप्रधान त्यांच्या निवासस्थानी इफ्तार पार्टी ठेवायचे आणि त्याला सरन्यायाधीश उपस्थित रहायचे. पण, गणपती आणि महालक्ष्मी पूजनाला पंतप्रधान नरेंद्र मोदीजी गेले तर इतका गहजब का? हिंदूत्त्वाला विरोध करता-करता आता गणपती आणि गौरी-महालक्ष्मींना विरोध करण्यापर्यंत का मजल जावी? अशी विचारणा देवेंद्र फडणवीस यांनी केली.

हे ही वाचा : मनातल्या शंका काल पक्क्या झाल्या…; पंतप्रधान मोदी – सरन्यायाधीशांच्या भेटीवरुन संजय…

हा महाराष्ट्रीयन सणांचा, महाराष्ट्र धर्माचा, मराठी संस्कृतीचा, गौरी-गणपतींच्या भक्ती आणि श्रद्धेचा, अपमान नाही का? (माहितीसाठी 18 सप्टेंबर 2009 रोजी तत्कालिन पंतप्रधानांच्या निवासस्थानी तत्कालिन सरन्यायाधीश उपस्थित असल्याचे फोटो आणि संबंधित बातमीची लिंक)”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

अजित

Ajit Pawar: अजित दादांनी केला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या ‘मी पुन्हा येईन’...

0
पुणे | Pune मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पुस्तक लिहायला सांगणार असल्याचे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. अजित पवार यांच्या हस्ते आज पुण्यात राज्य कुटुंब कल्याण भवन...