Friday, May 29, 2026
Homeक्राईमAkole : पांजरे येथे वनरक्षकास मारहाण; दोघांवर गुन्हा दाखल

Akole : पांजरे येथे वनरक्षकास मारहाण; दोघांवर गुन्हा दाखल

अकोले |प्रतिनिधी| Akole

- Advertisement -

काजवा महोत्सवानिमित्त भंडारदरा परिसरात मोठ्या प्रमाणावर पर्यटक गर्दी करत आहे. त्यामुळे वन्यजीव वनविभाग क्षेत्रात प्रवेश करण्यासाठी वाहनांची तपासणी करुन पर्यटकांकडून प्रवेश शुल्क आकारत आहे. या संदर्भातच माझ्या मुलाला तुम्ही का थांबवले म्हणून वनरक्षकास शिवीगाळ करुन मारहाण केल्याची घटना पांजरे नाक्यावर घडली आहे. याप्रकरणी राजूर पोलिसांत दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस पुत्र साई बाळू बांगर व मुंबई येथे कार्यरत असलेले लक्ष्मण बांगर (रा. मुरशेत, बांगरवाडी) अशी दोघांची नावे आहेत. वनरक्षक चंद्रकांत तळपाडे यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार पांजरे नाक्यावर प्रभारी म्हणून नेमणुकीस असताना पर्यटकांच्या वाहनांची तपासणी करुन पर्यटन शुल्क आकारत काजवा पाहण्यासाठी अभयारण्य क्षेत्रात परवानगी दिली जात आहे. दरम्यान, रात्रीच्या सुमारास परशुराम हरी पद्मेरे, नथू गोविंद उघडे, करण विजय सोनवणे, गणेश धोडू उघडे, अशोक चाहू उघडे, संतोष तुकाराम उघडे, पार्थ गोरख भांगरे असे नाका मदतनीस त्यांच्या सोबत होते. त्याचवेळी एक वाहन (क्र.एमएच.05, ईक्यू.2651) आली तेव्हा तिच्या डॅश बोर्डवर पोलीस नावाची पाटी लावलेली व लाल निळ्या रंगाचा एलईडी दिवा लावलेला होता.

तेव्हा अनोळखी इसमास तुझी गाडी पर्यटकांच्या गाड्यांच्या मागे उभी कर, असे म्हणालो असता त्याचा राग आला आणि शिवीगाळ केली. काही वेळातच तेथे अनोळखी इसमाचे वडील आले आणि वनरक्षकाच्या गणवेशात असतानाही काही एक ऐकून न घेता मारहाण केली. त्यानंतर ढकलून देत आम्ही स्थानिक असून माझ्या मुलाला तुम्ही का थांबवले? असे म्हणून शिवीगाळ केली. तसेच साई बाळू बांगर व बाळू लक्ष्मण बांगर हे दोघे म्हणाले, तुला काय करायचे ते तू कर, पुन्हा आमच्या नादी लागला तर तुला जीवे मारुन टाकील अशी धमकी देत निघून गेले. यावरून राजूर पोलिसांनी साई बांगर व मुंबई पोलीस लक्ष्मण बांगर या दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक किशोर पवार हे करीत आहे.

ताज्या बातम्या

Crime News : स्पा सेंटरच्या नावाखाली देहविक्रीचे रॅकेट उघड

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar शहरातील अहिल्यानगर-मनमाड रस्त्यालगत असलेल्या साई मिडास इमारतीमध्ये अँक्यूम स्पा सेंटरवर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने बुधवारी (27 मे) रात्री धाड टाकून सुरू...