Friday, May 3, 2024
Homeमुख्य बातम्याफडणवीस उद्याच मुख्यमंत्रीपदी विराजमान?

फडणवीस उद्याच मुख्यमंत्रीपदी विराजमान?

मुंबई | Mumbai

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी काल फेसबुक लाईव्हद्वारे जनतेशी संवाद साधला. या संवादात त्यांनी मुख्यमंत्रीपद आणि विधानपरिषद सदस्य पदाचा राजीनामा (Resigned) दिला. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagat singh Koshyari) यांना राजीनामा सुपूर्द केला…

- Advertisement -

आज भाजपच्या (BJP) कोअर ग्रुपची बैठक होणार आहे.या बैठकीत एकनाथ शिंदेंसह (Eknath Shinde) ३९ बंडखोर आमदारांच्या गटासोबत जाण्याबाबत आणि सत्तास्थापनेसंदर्भात चर्चा होण्याची शक्यता आहे.

बंडखोर आमदारांचा गट सध्या गोव्यात आहे. त्यामुळे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून ही बैठक घेतली जाऊ शकते. दुपारी दीडच्या सुमारास ही बैठक होण्याची शक्यता आहे.

तसेच उद्या (दि. १ जुलै) देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील, अशी जोरदार चर्चा रंगत आहे. मुख्यमंत्री म्हणून फडणवीस १ जूलै रोजी शपथ घेण्यामागे एक विशेष कारण असल्याचे समोर येते.

फडणवीस मुख्यमंत्री झाल्यास एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळतील, अशीही चर्चा रंगत आहे. या पार्श्वभूमीवर आज भाजपच्या काही महत्वाच्या बैठकी पार पडणार आहेत.

उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर भाजप (BJP) सत्तास्थापनेसाठी जोरदार प्रयत्न करत आहे. भाजपाकडून उद्याच शपथविधी करण्यामागील कारण म्हणजे दि. २ जुलै रोजी हैदराबादमध्ये (Hyderabad) राष्ट्रीय कार्यकारणीची बैठक होणार आहे.

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे या कार्यकारणीची बैठकीला उपस्थित राहणार आहे. मात्र त्याआधीच ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. फडणवीस हे या बैठकीला मुख्यमंत्री म्हणूनच हजर राहतील, असे समजते.

- Advertisment -

ताज्या बातम्या