Wednesday, September 23, 2026
Homeराजकीयदिल्लीत घडामोडींना वेग! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पंतप्रधान मोदींच्या भेटीला

दिल्लीत घडामोडींना वेग! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पंतप्रधान मोदींच्या भेटीला

दिल्ली। Delhi

राज्याच्या राजकीय पटलावर गेल्या काही दिवसांपासून पडद्यामागे अनेक मोठ्या घडामोडी घडत असतानाच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अचानक नवी दिल्ली गाठत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे. मुख्यमंत्र्यांच्या या अनपेक्षित दिल्ली दौऱ्यामुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली असून, सत्ताधाऱ्यांसह विरोधकांमध्येही राजकीय तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

- Advertisement -

विरोधी पक्षांनी नुकताच दावा केला होता की, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केंद्र सरकारमध्ये एखादी मोठी आणि अतिशय महत्त्वाची जबाबदारी सोपवली जाण्याची शक्यता आहे. त्यातच दुसरीकडे, राज्यातील सत्ताधारी महायुती सरकारमध्ये अंतर्गत नाराजीनाट्य पेटल्याच्या चर्चाही सातत्याने सुरू आहेत. काही दिवसांपूर्वीच पार पडलेल्या एमएमआरडीएच्या (MMRDA) एका अत्यंत महत्त्वाच्या शासकीय कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अनुपस्थित राहिल्याने या चर्चांना उघड उघड खतपाणी मिळाले होते. या सर्व राजकीय तणावाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांची ही पंतप्रधान मोदींसोबतची दिल्लीत झालेली बैठक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि निर्णायक मानली जात आहे.

भेटीनंतर मुख्यमंत्र्यांनी स्वतः सोशल मीडियावरून यासंदर्भात अधिकृत माहिती प्रसिद्ध केली आहे. “देशाचे यशस्वी पंतप्रधान आणि भारताचे वैश्विक नेतृत्व मा. नरेंद्र मोदीजी यांची आज नवी दिल्ली येथे भेट घेतली आणि विविध विषयांवर सविस्तर चर्चा केली. महाराष्ट्रातील विविध विकास प्रकल्पांची सविस्तर माहिती त्यांना दिली आणि केंद्र सरकारशी समन्वयातून राबविल्या जात असलेल्या योजना, प्रकल्पांबाबत सहकार्यही मागितले. नेहमीप्रमाणेच त्यांची भेट एक नवी ऊर्जा देणारी असते. त्यांचे विकासाच्या प्रश्नांवर बहुमूल्य मार्गदर्शन आणि महाराष्ट्राला भक्कम पाठिंबा, यासाठी मी त्यांचा नितांत आभारी आहे!” अशी भावना देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.

शासकीय स्तरावर आणि अधिकृत निवेदनानुसार, ही भेट केवळ महाराष्ट्रातील प्रलंबित विकास प्रकल्पांना गती देण्यासाठी आणि केंद्रीय सहकार्यासाठी असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. परंतु, महायुतीमधील मित्रप पक्षांतील ताणतणाव, संभाव्य मंत्रिमंडळ फेरबदल आणि फडणवीसांच्या दिल्लीतील संभाव्य भूमिकेबाबत राजकीय गोटात तर्क-वितर्कांचे वादळ अजूनही शांत झालेले नाही.

ताज्या बातम्या

Rahata : राहाता बाजार समितीत डाळिंबाची आवक; वाचा भाव

0
राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata बुधवारी राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) डाळिंबाला प्रतिकिलोला 305 रुपये भाव मिळाला. डाळिंबाच्या (Pomegranate) 4734 कॅरेटची आवक झाली. डाळिंब नंबर...