Tuesday, October 20, 2026
Homeब्रेकिंग न्यूजManoj Jarange : "भाजप तुम्हाला संपवतोय की..."; मनोज जरांगेंचा DCM शिंदेंवर हल्लाबोल,...

Manoj Jarange : “भाजप तुम्हाला संपवतोय की…”; मनोज जरांगेंचा DCM शिंदेंवर हल्लाबोल, नेमकं काय म्हणाले?

बीड | Beed

मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी बीड जिल्ह्यातील (Beed District) प्रसिद्ध नारायण गडावरील दसरा मेळाव्यात महायुती सरकार (Mahayuti Government) आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप केला आहे. “एकनाथ शिंदे साहेब, तुम्ही भाजपकडून ५०० कोटी रुपये घेतले आणि ते मला पोहोचवले, अशी कुजबूज दिल्लीत भाजप नेत्यांमध्ये सुरू आहे. तुम्ही माझ्याबद्दल नेमकं काय सांगितलं? याचं उत्तर मला द्या,” असा थेट सवाल जरांगे यांनी एकनाथ शिंदेंना केला आहे.

- Advertisement -

भाजप तुम्हाला संपवतोय की मला, याचा छडा लावणार

मेळाव्यातील आपल्या भाषणात आक्रमक भूमिका मांडत जरांगे म्हणाले की, “मला सात-आठ महिन्यांपूर्वी एका गोष्टीची कुणकुण लागली होती, पण मी ती मनातून काढून टाकली होती. मात्र, आता मला याचं उत्तर हवं आहे. दिल्लीतील आणि महाराष्ट्रातील भाजप नेत्यांमध्ये अशी चर्चा सुरू आहे की, एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) भाजपकडून ५०० कोटी रुपये घेऊन ते श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून मला दिले आहेत. एकनाथ शिंदे साहेब, तुम्ही मला ५०० कोटी रुपये दिलेत का? तुम्ही जर हे दिले नसतील, तर भाजप तुम्हाला संपवतेय की तुम्ही मला संपवताय, याचा छडा मी लावल्याशिवाय राहणार नाही”, असे त्यांनी म्हटले. तसेच जर योग्य उत्तर मिळाले नाही, तर याचा जाब विचारला जाईल आणि मराठा समाज ताकदीने उभा राहील, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. गरज पडल्यास मुंबईला आंदोलनासाठी पुन्हा तयार राहण्याचे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.

शेतकऱ्यांच्या मदतीवरून सरकारवर ताशेरे

जरांगे यांनी यावेळी शेतकऱ्यांच्या (Farmer) प्रश्नांवरही आक्रमक भूमिका मांडत सरकारवर टीका केली. सरकारने शेतकऱ्यांना जाहीर केलेल्या ५ हजार रुपयांच्या मदतीचे उपरोधिक गणित मांडताना ते म्हणाले, “शेतकऱ्यांना मदतीचे ५ हजार रुपये मिळवण्यासाठी २०० रुपयांचे पेट्रोल जाळून कार्यालयात जावे लागते, हेलपाटे घालून ३२०० रुपयांचे जेवण होते. यात शेतकऱ्यांच्या हाती काय पडणार? शेतकरी आज संकटात आहे आणि राज्य सरकारने शेतकऱ्यांना हेक्टरी १ लाख रुपये मदत दिली पाहिजे, असे म्हटले. तसेच जीएसटी सामान्य जनतेने भरायचा आणि नेत्यांचे बंगले मात्र मोठे होणार, असा टोला लगावत जरांगे यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी सर्वपक्षीय नेते व कृषी तज्ज्ञांना एकत्र येण्याचे आवाहन केले.

ताज्या बातम्या

Nashik News : जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणासाठी १३ कोटींचा कृती आराखडा; ७७७...

0
नाशिक | Nashik नाशिक जिल्ह्यात (Nashik District) ऑक्टोबर २०२६ ते जून २०२७ या कालावधीत उद्भवू शकणाऱ्या संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने १३ कोटी ८४...