Thursday, May 2, 2024
Homeमुख्य बातम्याVIDEO : अली जनाब उद्धव ठाकरेंना शोभतं का?; मालेगावातील सभेआधी फडणवीसांचा खोचक...

VIDEO : अली जनाब उद्धव ठाकरेंना शोभतं का?; मालेगावातील सभेआधी फडणवीसांचा खोचक सवाल

मुंबई | Mumbai

शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची खेडनंतर आज मालेगाव येथे सभा होत आहे. खेडमधील सभेत उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटावर सडकून टीका केल्यानंतर प्रतिउत्तरादाखल एकनाथ शिंदे यांनीही खेडमध्ये सभा घेतली होती. त्यानंतर आता मालेगावात ठाकरे काय बोलणार याची उत्सुकता लागली आहे.

- Advertisement -

मात्र, तत्पूर्वी, उद्धव ठाकरे यांच्या सभेसाठी लावण्यात आलेल्या ऊर्दू भाषेतील बॅनरची जोरदार चर्चा सुरू आहे. यावरून आता उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर टीका सुरू आहे. एकनाथ शिंदे गट आणि भाजपाने या बॅनरवरून उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. मालेगावातील सभेच्या उर्दू बॅनरवरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

ठाकरेंच्या मालेगावातील सभेआधी संजय राऊतांचा शिंदेंवर ‘वार’, दादा भुसेंना दिला इशारा

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, अली जनाब वगैरे जे काही आहे ते उद्धव ठाकरे यांना भूषणावह वाटतं का? हे त्यांना विचारा. उर्दू ही एक भाषा आहे, त्या भाषेमध्ये कोणी काही म्हटलं तर काही हरकत नाही. आम्ही कोणत्याही धर्माच्या विरोधात नाही. पण आम्ही लांगुलचालनाच्या विरोधात आहोत. काँग्रेस राष्ट्रवादीसोबत जाऊन जर ते लांगुलचालन करत असतील तर त्यांना याचं उत्तर स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना द्यावं लागेल.

अख्खं कुटुंब संपलं! दोन मुलांसह उच्चशिक्षित पती पत्नीची विष घेवून आत्महत्या

दरम्यान उर्दू भाषेतील पोस्टरचे संजय राऊत यांनी समर्थन केले असून, महाराष्ट्रामध्ये आणि देशांमध्ये उर्दूवर काही बंदी आहे का? अनेक लेखक, अनेक अभ्यासक साहित्यिक त्यांनी उर्दूमध्ये लिखाण केलेल आहे. आणि त्याच्यामुळे मुस्लिम बांधवांनी जास्तीत जास्त या सभेला यावे, यासाठी ठाकरे गटाकडून हे प्रयोजन केल्याचं संजय राऊत यांनी म्हटले आहे. यातील काही बॅनरवर ‘मालेगावची शिवसेना, शिवसेनेचे मालेगाव’, लिहिले असल्याचे सांगितले जात आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या