Thursday, March 13, 2025
HomeनगरShirdi : भाविकांना त्रास देणार्‍या 72 भिकार्‍यांची शिर्डीत धरपकड

Shirdi : भाविकांना त्रास देणार्‍या 72 भिकार्‍यांची शिर्डीत धरपकड

शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi

दुहेरी हत्याकांडानंतर (Shirdi Double Murder) प्रशासन खडबडून जागे झाले असून भयमुक्त शिर्डी (Shirdi) करण्यासाठी प्रशासन आता अ‍ॅक्शन मोडवर आले आहे. गुरुवारी पहाटे शिर्डी पोलीस (Shirdi Police), नगरपरिषद व साईबाबा संस्थान (Sai Baba Sansthan) यांनी संयुक्त कारवाई करत 72 भिकार्‍यांना (Beggars) ताब्यात घेऊन त्यांची रवानगी बेगर हाऊस येथे करण्याचा निर्णय घेतला आहे. शिर्डीत अशा प्रकारची कारवाई प्रथमच झाल्याने स्थानिक ग्रामस्थांनी व भाविकांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. हे सर्व भिकारी 14 जिल्ह्यासह 5 राज्यातील आहेत. तसेच यात एका सेवानिवृत्त पोलिस उपनिरीक्षकाचा समावेश आहे.

- Advertisement -

शिर्डीतील दुहेरी हत्याकांड प्रकारानंतर जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Water Resources Minister Radhakrishna Vikhe Patil) व डॉ. सुजय विखे पाटील (Dr. Sujay Vikhe Patil) यांनी शिर्डीची गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी पोलीस, नगरपरिषद व साई संस्थान प्रशासनाची बैठक घेऊन दारू, मटका, जुगार, गुटखा व इतर मोठ्या प्रमाणात चालणारे अवैध व्यवसायांना कायमस्वरूपी आळा घालण्यासाठी व शिर्डीतील गुन्हेगार प्रवृत्तीच्या व्यक्तींनी विरोधात कठोर कारवाई करण्याच्या आदेश दिले होते. शिर्डी ग्रामस्थांनी (Shirdi Villagers) देखील ग्रामसभा घेऊन भयमुक्त शिर्डीचा नारा देऊन शिर्डीतील गुन्हेगारांना पाठीशी घालणार्‍या विरोधात व वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी ग्राम सुरक्षा दल व रात्री 11 ते पहाटे 5 पर्यंत शिर्डी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

दुहेरी हत्याकांडानंतर पोलीस निरीक्षक रणजीत गलांडे यांची बदली शिर्डी येथे करण्यात आल्यानंतर त्यांनी गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक व शिर्डीचे पोलीस उपअधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस ठाण्याच्या कागदावर असलेल्या गुन्हेगारांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई तसेच तडीपार असलेल्या गुन्हेगारांना पकडण्यासाठी मोहीम हाती घेतली. याबरोबरच शिर्डीतील मोठ्या प्रमाणात सुरू असलेला गुटखा (Gutkha), जुगार (Gambling), मटका (Matka) व इतर अवैध व्यवसायावर छापा (Illegal Business Raid) टाकण्याची मोहीम हाती घेत गुरुवारी भाविकांना नशा करून पैसे मागण्याकरिता त्रास देणार्‍या 60 पुरुष तसेच 12 महिला असे एकूण 72 भिकार्‍यांना ताब्यात घेऊन त्यांची आरोग्य तपासणी करत त्यांना न्यायालयासमोर हजर करून न्यायालयाच्या परवानगीने पुरुष भिकार्‍यांना श्रीगोंदा येथील विसापूर बेगर होम तसेच महिला भिकार्‍यांना (Women Beggars) मुंबई येथील बेगर होम मध्ये रवांनगी करण्यात येणार आहे.

वेगवेगळ्या प्रकारच्या नशा व अमली पदार्थ सेवन करून भाविकांना त्रास देणारे पकडण्यात आलेले 72 भिकारी (Beggars) हे शिर्डी, अहिल्यानगर, मुंबई, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, पुणे, वाशिम, जळगाव, अकोले, बुलढाणा, नांदेड, सांगली, सोलापूर, यवतमाळ, कर्नाटक, मध्यपदेश, आंध्रप्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल या ठिकाणाहून शिर्डीत भिक्षा मागण्यासाठी आलेले असल्याचे निष्पन्न झाले आहे. भाविक व ग्रामस्थांना भिकार्‍यांपासून मोठ्या प्रमाणात त्रास होत असल्याने डॉ. सुजय विखे पाटील यांनी या विरोधात कडक कारवाई करण्याची भूमिका घेतली. शिर्डीतील गुन्हेगारींचा देखील त्यांनी बंदोबस्त करण्यासाठी मोहीम हाती घेतल्याने त्यांच्या या भूमिकेचे ग्रामस्थांनी स्वागत केले आहे.

शिर्डीत गुरुवारी पोलीस निरीक्षक रणजित गलांडे, साई संस्थांचे सुरक्षा अधिकारी रोहिदास माळी व नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सतीश दिघे यांनी 72 भिकार्‍यांना पकडून त्यांना बेगर होम (Beggar Home) येथे पाठवण्याचा निर्णय घेतला. या मोहिमेत पकडण्यात आलेल्या भिकार्‍यांना त्यांच्या घरातील व्यक्तींनी कागदपत्र दाखवून सोडवण्यासाठी प्रयत्न केल्याचे दिसून आले. त्यामुळे अनेकांनी याबाबत आश्चर्य व्यक्त केले. शिर्डीत (Shirdi) अद्याप पर्यंत एवढी मोठी कारवाई अद्याप झाली नाही. सदर कारवाई सातत्याने सुरूच राहिली पाहिजे तरच शिर्डी भिकारी मुक्त होऊ शकेल अशी ग्रामस्थांमधून चर्चा आहे.

एक भिकारी सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक; बँक बॅलन्स दहा लाखांच्या वर
शिर्डीत गुरुवारी पोलिसांनी ताब्यात घेतलेले भिकारी हे 5 विविध राज्यांतील व 16 जिल्ह्यांतील असून त्यातील एक भिकारी सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक आहे. सदर सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक यांच्या बँक खात्यावर दहा ते पंधरा लाख रुपये असल्याचे समजते. यातील एक महिला भिकारी हिच्या मुलाने त्याच्यावर मोठे कर्ज झाले असल्याने आईला शिर्डीत भीक मागण्यासाठी पाठवले असल्याचे उघडकीस आले.

शिर्डीत वेगवेगळ्या जिल्ह्यातून व राज्यातून भिकारी या ठिकाणी येऊन नशा करून भाविकांना पैसे मागण्यासाठी त्रास देतात. पैसे दिले नाही तर त्यांच्या अंगाला झटापट करून वाद घालतात. त्यामुळे भाविकांमध्ये भीती निर्माण होते. सकाळी वयोवृद्ध नागरिकांना भीक मागण्यासाठी शिर्डीत सोडून देणे व सायंकाळी घेऊन जाणे अशी पद्धत वापरून पैसे मागण्याचा व्यवसाय केला जातो. भिकारी पकडण्याची मोहीम काही दिवसापासून बंद होते ती आता सुरू झाल्याने भाविक व ग्रामस्थांमध्ये समाधान आहे. ना. राधाकृष्ण विखे पाटील व डॉ. सुजय विखे पाटील यांनी शिर्डीतील गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी प्रशासनाला सक्त कारवाई करण्याचे आदेश दिले त्याबद्दल त्यांचे ग्रामस्थांच्या वतीने आभार. स्वच्छ व सुंदर तसेच भयमुक्त शिर्डी ठेवण्यासाठी प्रशासनाने सध्या सुरू असलेली कारवाई कायमस्वरूपी ठेवावी हीच अपेक्षा.
– अभय शेळके, माजी उपनगराध्यक्ष

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik News : कृष्णा आंधळे नाशकात दिसला? दीड महिन्यांनी पुन्हा नागरिकांचा...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik बीड जिल्ह्यातील (Beed District) मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतील मुख्य संशयित कृष्णा आंधळे (Krishna Andhale) तीन महिन्यांपासून...