Friday, May 3, 2024
Homeधुळेधनुरची कन्या भारतीय सैन्य दलात भरती

धनुरची कन्या भारतीय सैन्य दलात भरती

कापडणे – Kapadane – प्रतिनिधी :

धनुर येथील रेणुका वसंत पाटील ही भारतीय सैन्य दलात भरती होत गावाची मान उंचावली आहे.

- Advertisement -

भारतीय सैन्यात भरती होणारी तालुक्यातील पहिलीच मुलगी आहे. रेणुका हिच्या वडीलांनी नऊ वर्ष सैन्य दलात सेवा बजावली आहे.

कौटुंबिक जबाबदारी अन् अडचणींमुळे त्यांच्या देशसेवेत खंड पडला, आपल्या मुलीने देशाची सेवा करावी ही वडिलांची इच्छा रेणुका पाटीलने पूर्ण केली. या धाडशी निर्णयाचे परिसरातुन कौतुक होत आहे.

रेणुका ही धनुर येथील वसंत धाकु शिंदे या माजी सैनिकांची मुलगी आहे. घरात लहानपणापासुनच देशभक्तीचे वातावरण असल्याने रेणुका पाटीलचा लहानपणापासुनच भारतीय सैन्य दलाकडे ओढा होतो. तिने एम.ए. पर्यतचे शिक्षण पूर्ण केले आहे.

महाविद्यालयात असतांना एनसीसीत सहभागी झाली होती. रेणुका ही साहस व जिद्दीने सिमा सुरक्षा दलात भरती झाली. बीएसएफच्या माध्यमातून देशसेवा ती करणार आहे.

भरतीच्या पार्श्वभूमीवर वडिलांनी मैदानी सराव करुन घेतला तसेच वडिलांनी मुलगा व मुलगी असा भेदभाव न करता शिकवले म्हणुन मला देशसेवेची संधी मिळत असल्याचेही रेणुकाने सांगितले.

रेणुकाने सैन्य दलात भरती होऊन आमच्या कुटूंबाची व गावाची मान उंचावली व माझे अपुरे स्वप्न पूर्ण केले असे मत माजी सैनिक वसंत पाटील यांनी व्यक्त केले.

चाकुर (जि.लातुर) येथील प्रशिक्षण केंद्रात 9 महिने ट्रेनिंग चालणार असून यासाठी रेणुका पाटील या आज रुजु झाली.

- Advertisment -

ताज्या बातम्या