Saturday, July 25, 2026
Homeब्रेकिंग न्यूजDharmendra Passes Away : अलविदा 'वीरू'; सर्वसामान्य कुटुंबातून आलेला मुलगा असा बनला...

Dharmendra Passes Away : अलविदा ‘वीरू’; सर्वसामान्य कुटुंबातून आलेला मुलगा असा बनला बॉलिवूडचा ‘ही-मॅन’

मुंबई | Mumbai

ज्येष्ठ अभिनेते आणि बॉलिवूडचे ‘ही’ मॅन अशी ओळख असलेले धर्मेंद्र यांचं निधन (Dharmendra Passes Away) झालं आहे. वयाच्या ८९ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. तब्बल सहा दशकांहून अधिक सिनेसृष्टीवर आपले नाव गाजवलेल्या धर्मेंद्र यांच्या निधनाने संपूर्ण सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे.

- Advertisement -

गेल्या काही दिवसांपासून प्रकृती अस्वास्थामुळे धर्मेंद्र यांच्यावर मुंबईतील (Mumbai News) ब्रीच कँडी रुग्णालयात (Breach Candy Hospital) उपचार सुरू होते. तब्येत खालावल्यामुळे धर्मेंद्र (Actor Dharmendra) यांना साधारणतः बारा दिवसांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर धर्मेंद्र यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलेला. तेव्हापासून ते घरीच होते. पण, अखेर त्यांच्या जुहूतील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

धर्मेंद्र यांच्या प्रकृती अस्वास्थापासूनच वेगवेगळ्या बातम्या माध्यमांमध्ये पसरत होत्या. अनेक अफवाही पसरलेल्या होत्या. अद्याप देओल कुटुंबीयांनी धर्मेंद्र यांच्या मृत्यूबाबत (Death) कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. मात्र, आयएनएस वृत्तसंस्थेने धर्मेंद्र यांचे निधन झाल्याचे वृत्त दिले आहे. धर्मेंद्र यांच्या पार्थिवावर पवन हंस स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. तब्बल सहा दशकं सिनेसृष्टीवर राज्य करणारा कोहिनूर हरपल्याने मोठी पोकळी निर्माण झाली आहे. धर्मेंद्र यांच्या निधनाने अख्खं बॉलिवूड शोकसागरात बुडालं आहे.

धर्मेंद्र यांची कारकिर्द

धर्मेंद्र यांचा जन्म ८ डिसेंबर १९३५ रोजी पंजाबमधील नसराली या गावात झाला. त्यांनी १९६० साली दिल भी तेरा हम भी तेरे या चित्रपटातून कारकिर्दीला सुरुवात केली. त्या नंतर फुल और पत्थर या चित्रपटाच्या माध्यमातून त्यांना तुफान लोकप्रियता मिळाली. या चित्रपटासाठी त्यांना पहिला फिल्म फेअर पुरस्कार ही मिळाला. धर्मेंद्र यांनी आपल्या सहा दशकांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत ‘शोले’, ‘चुपके चुपके’, ‘सत्यकाम’, ‘सीता और गीता’ यांसारख्या अनेक गाजलेल्या चित्रपटांत काम केलं. त्यांनी 300 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलं आहे.

2012 मध्ये त्याला पद्मभूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. धर्मेंद्र यांनी 1960 मध्ये ‘दिल भी तेरा हम भी तेरे’ या चित्रपटातून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी ‘फूल और पत्थर’, ‘सीता और गीता’, ‘शोले’, ‘धरमवीर’, ‘आंखे’, ‘राजा जानी’,,” ‘गुलामी’, ‘प्रतिज्ञा’, ‘नये जमाना’, ‘ बर्निंग ट्रेन’ आणि ‘यादों की बारात’ यासह अनेक हिट चित्रपट दिले.

धर्मेंद्र यांचा शेवटचा चित्रपट

धर्मेंद्र ८९ व्या वर्षीही सतत काम करत होते. त्यांच्या निधनानंतरचा त्यांचा शेवटचा चित्रपट या वर्षी प्रदर्शित होणार आहे. ते “२१” चित्रपटात दिसणार आहेत, ज्यामध्ये ते अगस्त्य नंदाच्या वडिलांची भूमिका साकारणार आहेत. हा चित्रपट २५ डिसेंबर २०२५ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

ताज्या बातम्या

देवेंद्र

इकडे धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीस दिल्लीला रवाना, घडामोडींना...

0
मुंबई | Mumbaiदिल्लीतील कॉकरोच जनता पार्टीच्या आणि विद्यार्थी आंदोलनानंतर अखेर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान (Dharmendra Pradhan) यांनी आपल्या मंत्रि‍पदाचा राजीनामा (Resignation) दिला आहे. हे...