Friday, October 2, 2026
Homeक्रीडाबॉक्सिंगमध्ये सुवर्ण हॅटट्रिकनंतर कुस्तीमध्येही सोनेरी झेप! सुजीत कालकलचे रोमहर्षक सुवर्ण; भारताची पदकतालिकेत...

बॉक्सिंगमध्ये सुवर्ण हॅटट्रिकनंतर कुस्तीमध्येही सोनेरी झेप! सुजीत कालकलचे रोमहर्षक सुवर्ण; भारताची पदकतालिकेत मोठी भरारी

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
आयची-नागोया येथे सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या पदकविजयाची घोडदौड सुरूच आहे. बॉक्सिंगमध्ये परवीन हुड्डा, लव्हलिना बोरगोहेन आणि अंकुश पंघाल यांनी एकाच दिवशी तीन सुवर्णपदके जिंकून ‘गोल्डन हॅटट्रिक’ साधल्यानंतर आता कुस्तीपटू सुजीत कालकलनेही भारताच्या खात्यात आणखी एक सुवर्णपदक जमा केले आहे. पुरुषांच्या फ्रीस्टाइल ६५ किलो वजनी गटाच्या अंतिम सामन्यात सुजीतने ताजिकिस्तानच्या अब्दुलमजीद कुदियेवचा १०-९ असा रोमहर्षक पराभव केला.

या विजयासह भारताची एकूण पदकसंख्या ७५ झाली असून भारताच्या खात्यात १५ सुवर्ण, २५ रौप्य आणि ३५ कांस्यपदके जमा झाली आहेत.

- Advertisement -

२-९ अशी पिछाडी अन् अखेर सुवर्णपदक!
सुजीत आणि कुदियेव यांच्यातील अंतिम सामना अत्यंत चुरशीचा झाला. सुरुवातीला ताजिकिस्तानच्या कुदियेवने आघाडी घेत सुजीतला अडचणीत आणले. एका टप्प्यावर सुजीत २-९ असा पिछाडीवर होता. सुवर्णपदक त्याच्या हातातून निसटणार असे चित्र निर्माण झाले होते. मात्र शेवटच्या दीड मिनिटात सुजीतने सामन्याचे चित्रच बदलून टाकले. त्याने सलग गुण मिळवत अंतर कमी केले. त्यानंतर आणखी एक महत्त्वाची टेकडाउन करत त्याने १०-९ अशी आघाडी मिळवली आणि अखेर ही आघाडी कायम ठेवत सुवर्णपदकावर नाव कोरले. २-९ वरून १०-९ असा विजय हा सुजीतच्या सामन्यातील सर्वात नाट्यमय टप्पा ठरला.

अंतिम फेरीआधी ऑलिम्पिक चॅम्पियनचा पराभव
सुवर्णपदकाच्या अंतिम सामन्यापूर्वीच सुजीतने मोठा धक्का दिला होता. उपांत्य फेरीत त्याचा सामना जपानच्या विद्यमान ऑलिम्पिक चॅम्पियन कोतारो कियोओका याच्याशी झाला. दोन्ही मल्लांमध्ये अत्यंत बचावात्मक आणि तांत्रिक लढत झाली. सामना ३-३ असा बरोबरीत सुटला. मात्र मोठा गुण मिळवल्याच्या निकषावर सुजीतला विजेता घोषित करण्यात आले आणि त्याने अंतिम फेरीत प्रवेश केला. घरच्या मैदानावर खेळणाऱ्या ऑलिम्पिक विजेत्याचा पराभव करून अंतिम फेरी गाठणे ही सुजीतच्या आशियाई स्पर्धेतील मोहिमेतील महत्त्वाची कामगिरी ठरली.

उपांत्यपूर्व फेरीत इराणी मल्लाला एकही गुण दिला नाही
सुजीतची स्पर्धेतील सुरुवातही दमदार झाली. पहिल्या फेरीत अफगाणिस्तानच्या सय्यद उमर झाझाईचा १३-३ असा तांत्रिक वर्चस्वाने पराभव केला. त्यानंतर उपांत्यपूर्व फेरीत इराणच्या अब्बास इब्राहिमजादेहस्सवादकौहीचा १०-० असा पराभव करत सुजीतने आपली ताकद दाखवून दिली. विशेष म्हणजे या सामन्यात त्याने प्रतिस्पर्ध्याला एकही गुण मिळू दिला नाही.

भारताचा अनुभवी फिरकीपटु युझवेंद्र चहलचली निवृत्ती, पोस्टमध्ये म्हणाला, खंत असली तरी…

६५ किलो वजनी गटात भारताचा सुवर्ण वारसा कायम
सुजीतचे हे सुवर्णपदक भारतीय कुस्तीच्या दृष्टीनेही विशेष महत्त्वाचे आहे. ६५ किलो वजनी गटात यापूर्वी योगेश्वर दत्तने २०१४ आणि बजरंग पुनियाने २०१८ आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते. आता सुजीतने या गटात भारताचा सुवर्णवारसा पुन्हा जिवंत केला आहे. २०२३च्या हांगझोऊ आशियाई स्पर्धेत भारताला कुस्तीमध्ये एकही सुवर्णपदक मिळाले नव्हते. त्यामुळे सुजीतचे यंदाचे सुवर्णपदक भारतीय कुस्ती संघासाठी विशेष ठरले आहे.

बॉक्सिंगमध्ये भारताची ‘गोल्डन हॅटट्रिक’
सुजीतच्या सुवर्णपदकापूर्वी भारताने बॉक्सिंगमध्ये एकाच दिवशी तीन सुवर्णपदके जिंकली.
लव्हलिना बोरगोहेन – महिला ७५ किलो
परवीन हुड्डा – महिला ६५ किलो
अंकुश पंघाल – पुरुष ८० किलो
अंकुश पंघालने दक्षिण कोरियाच्या मिनसॉन्ग किमचा पराभव करत भारताच्या बॉक्सिंगमधील तिसरे सुवर्णपदक निश्चित केले. त्यामुळे भारताने एका दिवसात बॉक्सिंगमध्ये सुवर्णपदकांची हॅटट्रिक साधली. परवीन हुड्डाने चायनीज तैपेईच्या चेन निएन-चिनचा ३-२ असा, तर लव्हलिना बोरगोहेनने चीनच्या बाओ झियीचा ५-० असा पराभव केला.

ताज्या बातम्या

सचिव

MPSC: मोठी बातमी! MPSC चे सचिव महेंद्र हरपाळकर यांची बदली; शासन...

0
मुंबई | Mumbaiमहाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) कारभारावरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मोठा प्रशासकीय निर्णय घेतला आहे. MPSCचे सचिव महेंद्र हरपाळकर यांची सचिवपदावरील...