Thursday, May 2, 2024
Homeधुळेवरूळ गावातून बोगस बियाणे जप्त

वरूळ गावातून बोगस बियाणे जप्त

धुळे – Dhule – प्रतिनिधी :

शिंदखेडा तालुक्यातील वरूळ येथे एका घरातून कृषी विभागाच्या पथकाने कापसाच्या बोगस बियाण्यांचा साठा जप्त केला. काल दुपारी ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी कंपनी, कंपनी मालकासह तिघांवर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

याबाबत जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाचे प्रभारी मोहिम अधिकारी अभय नथ्थु कोर यांनी शिंदखेडा पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार काल दि. 23 रोजी दुपारी त्यांच्यासह पथकाने वरूळ गावातील प्रकाश पितांबर पाटील याच्या घरात छापा टाकला.

घरात तपासणी केली असता संकरीत कापुस ए-554 जीकं.चे कापुस बियाण्यांची एकुण 20 पाकीटे आढळून आली. त्यांची किंमत 15 हजार 346 रूपये असून ती जप्त करण्यात आली.

त्यावरून अनधिकृतपणे बोगस एचटीबीटी कापुस बियाण्याचे उत्पादन, वितरण व विक्रीच्या उद्देशाने साठा केल्याप्रकरणी बियाणे उत्पादक कंपनी, कंपनीचे मालक व जबाबदार व्यक्तीसह प्रकाश पाटील यांच्याविरोधात बि-बियाणे कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक गजानन गोटे करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या