धुळे – Dhule – प्रतिनिधी :
जिल्हा कारागृहातील दवाखाना विभागात एका कैद्याने धिंगाणा घालत तुरूंगाधिकार्यांसह कर्मचार्यांना शिवीगाळ करत त्यांच्या अंगावर धावून गेला. याप्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- Advertisement -
याबाबत तुरूंग अधिकारी दिपा आगे यांनी शहर पोलिसात फिर्यादी दिली आहे. त्यानुसार काल दि. 13 रोजी सकाळी सव्वा वाजेच्या सुमारास कारागृहातील दवाखाना विभागात अधिकारी व कर्मचार्यांसह साप्ताहिक तट संचार फेरी करत असतांना ,
शिक्षाबंदी महेश प्रकाश पवार यानेे दवाखाना विभागातील सेपरेट कोठडीमध्ये का ठेवले या कारणावरून शासकीय कामात अडथळा निर्माण केला.
तसेच शिवीगाळ करून तुरूंगअधिकार्यांच्या अंगावर धावून आला. याप्रकरणी शिक्षाबंदी महेश पवार यांच्याविरोधात शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.