Thursday, July 2, 2026
HomeUncategorizedआमदार पुत्राची पोलिसांना अश्लील शिवीगाळ

आमदार पुत्राची पोलिसांना अश्लील शिवीगाळ

धुळ्यातील घटना, मध्यरात्री हटकल्याचा राग 

धुळे  – 

शहरातील वडजाई रोड परिसरात मध्यरात्री एकत्रित घोळका केल्याबद्दल हटकल्यामुळे आ. डॉ. फारुख शाह यांच्या मुलाने कर्तव्यावर असलेल्या दोन पोलीस कर्मचार्‍यांना अश्लील शिवीगाळ करुन त्यांची मोबाईलमध्ये शुटींग केली. या प्रकरणी आझादनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

दि. 15 एप्रिल रोजी रात्री 12.15 वाजता वडजाई रोडवर पेट्रोलिंग करीत असतांना भोलाबाजार चौकात शहराचे आ.डॉ. फारुख शाह यांचा मुलगा शहबाज फारुख शाह व त्याचा साथीदार शाहरुख यांच्यासह दहा ते बारा जण एकत्रित जमा झालेले होते. त्यामुळे त्यांना पेट्रोलिंग करणार्‍या पोलिसांनी घरी जाण्यास सांगितले.

त्यातून शहबाज शाह याने पोहेकॉ दीपक रामलाल पाटील व पोकॉ रमेश गुरव यांच्याशी वाद घालून तुम्ही दारु पिवून ड्युटी करीत आहात, असे सांगून दोघा पोलीस कर्मचार्‍यांना अश्लिल शिवीगाळ करीत मोबाईलमध्ये त्यांची शुटींग केली.

अशी फिर्याद आझादनगर पोलीस ठाण्यात पोहेकॉ दीपक पाटील यांनी दिली. त्यावरुन शासनाने दिलेल्या आदेशाची अवज्ञा, संसर्ग पसरविण्यासाठी एकत्रित जमा होवून सार्वजनिक उपद्रव करुन फौजदारी संहिता 1973 चे कलम 144 (1) व (3) आदेशाचे उल्लंघन तसेच साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 चे कलम 2, 3 व 4 मधील पोट कलम ग (सी), ड (एम) आणि महाराष्ट्र कोविड 19 चे उपाययोजना 2020 चे कमल 11 प्रमाणे भंग, भादंवि 294, 269, 186, 188 सह राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 चे कलम 51 (ब) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ताज्या बातम्या

default-featured-image

Nashik Crime News : सक्तीने धार्मिक परिवर्तन करण्याचा प्रयत्न; सरकारवाडा पोलीस...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik उदरनिर्वाहासाठी परराज्यातून नाशिकमध्ये (Nashik) आलेल्या एका एकाकी महिलेला जाळ्यात ओढून तिच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेतल्याची घटना समोर आली आहे. लग्नाचे खोटे...