नाशिक | प्रतिनिधी | Nashik
उदरनिर्वाहासाठी परराज्यातून नाशिकमध्ये (Nashik) आलेल्या एका एकाकी महिलेला जाळ्यात ओढून तिच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेतल्याची घटना समोर आली आहे. लग्नाचे खोटे आमिष दाखवून ४१ वर्षीय महिलेवर अत्याचार (Rape) केल्याप्रकरणी आणि तिला सक्तीने दुसऱ्या धर्माच्या परंपरा पाळण्यास भाग पाडल्याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात (Sarkarwada Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रियाज बुराउद्दिन शेख (४०, रा. संजीवनीनगर, अंबड) असे संशयिताचे (Suspected) नाव असून, पो लीस सध्या त्याचा कसून शोध घेत आहेत. पीडित महिला मूळची नवी दिल्ली येथील असून ती काही वर्षांपासून नाशिकमध्ये वास्तव्यास आहे. २०२० मध्ये रविवार कारंजा परिसरात भाजी विक्री करणाऱ्या रियाज शेख याच्याशी तिची ओळख झाली होती. संशयिताने तिच्या असहाय्यतेचा फायदा घेत आधी प्रेमाचे नाटक केले आणि जवळीक साधली.
पीडितेचा पूर्ण विश्वास संपादन केल्यानंतर संशयिताने तिचे आधार, पॅनकार्ड आणि बँकेचे पासबुक स्वतःच्या ताब्यात घेतले, ज्यामुळे ती पूर्णपणे त्याच्यावर अवलंबून राहील अशी परिस्थिती निर्माण झाली. तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, संशयिताने पीडितेला भद्रकाली येथील एका लॉजवर नेऊन तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवले. त्यानंतर तिला इगतप-हीरी येथील एका धार्मिक स्थळी नेऊन गुलाबजलच्या नावाखाली संशयास्पद पाणी पाजण्यात आले.
अत्याचार एवढ्यावरच थांबला नाही; संशयिताने तिला अंबड (Ambad) येथील घरी आणून सक्तीने त्याच्या धर्माची प्रार्थना ऐकण्यास आणि धार्मिक पुस्तकांचे वाचन करण्यास भाग पाडले. पीडितेने या गोष्टींना विरोध केला असता, तिचे कपाळावरील टिकली लावणे बंद करून जाणीवपूर्वक तिच्या धार्मिक भावना दुखावल्या, असे फिर्यादीत नमूद आहे.
पोलिसांकडून कसून तपास
सततच्या मानसिक आणि शारीरिक जाचाला कंटाळून अखेर पीडितेने सरकारवाडा पो-लीस ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन संशयित रियाज शेखविरुद्ध भारतीय न्याय संहिता अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक पूनम नाईक तपास करत आहेत.




