Friday, May 3, 2024
Homeधुळेधुळ्याचा तापमानाचा पारा 6 अंशावर

धुळ्याचा तापमानाचा पारा 6 अंशावर

धुळे । प्रतिनिधी Dhule

धुळ्याचा तापमानाचा पारा घसरला असून रविवारी सकाळी तापमानाचा पारा 6 अंशावर गेल्याची नोंद कृषी महाविद्यालयाकडे करण्यात आली होती. परंतु दुपारनंतर मात्र तापमानाचा पारा वर चढला व पुन्हा सायंकाळनंतर थंडीत वाढ झाली.

- Advertisement -

गेल्या चार ते पाच दिवसांपासून तापमानाचा पारा घसरला आहे. आज सकाळी 6 अंशावर पारा आल्यामुळे थंडीची हुडहूडी जाणवली. अनेक ठिकाणी शेकोट्या पेटल्या. वाढत्या थंडीचा अनेकांना त्रास जाणवला. परंतु दुपारनंतर तापमानात वाढ झाली. त्यानंतर सायंकाळी मात्र पुन्हा तापमानाचा पारा खाली आला.

एकीकडे कोरोना महामारी व त्यात तापमानाचा पारा घसरत असल्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या