Friday, May 3, 2024
Homeभविष्यवेधघरात ताजमहाल ठेवला का?

घरात ताजमहाल ठेवला का?

घर सुंदर आणि आकर्षक दिसण्यासाठी आपण ते अनेक गोष्टींनी सजवतो. पण कधी-कधी आपण सजावटीसाठीही अशा वस्तू वापरतो ज्या वास्तूनुसार अशुभ मानल्या जातात. या गोष्टींमुळे घर सुंदर दिसत असेल, पण त्यामुळे वास्तुदोष निर्माण होतात आणि नकारात्मक ऊर्जा घरात राहू लागते. ताजमहालही सुंदर दिसतो. त्यामुळे बरेच लोक ताजमहालचा फोटो किंवा शोपीस घरात सजवण्यासाठी ठेवतात.

ताजमहाल हे प्रेमाचे प्रतीक मानले जाते, त्यामुळे बरेच लोक ताजमहालची भेट म्हणून देवाणघेवाण करतात. जर तुम्हीही ताजमहालचा फोटो किंवा शोपीस घरात ठेवला असेल किंवा भेटवस्तू म्हणून त्याचा व्यवहार करत असाल तर तुम्हाला त्याचे शुभ आणि अशुभ परिणाम माहीत असणे आवश्यक आहे.

- Advertisement -

ताजमहालला प्रेमाचे प्रतिक मानले जात असले तरी. पण शहाजहानने पत्नी मुमताजचा मृत्यू झाल्यावर ताजमहाल बांधला. शहाजहानने आपल्या पत्नीची कबर ताजमहालमध्ये बांधली. हिंदू धर्मानुसार घरात स्मशान किंवा समाधीचे चित्र ठेवणे अशुभ मानले जाते. त्यामुळे ताजमहालचे चित्र किंवा शोपीस घरी ठेवण्याचा विचार करू नका.

भेटवस्तू म्हणूनही ताजमहालचा देऊ नका – ताजमहाल म्हणजे थडगी आहे. वास्तुशास्त्रानुसार, समाधीसारख्या भेटवस्तू देणे किंवा घेणे टाळले पाहिजे. म्हणूनच कोणीही ताजमहाल भेट म्हणून देऊ नये. ताजमहालचा फोटो किंवा शोपीस कोणाकडून भेट मिळाला तरी तो घरी सजवू नको.

- Advertisment -

ताज्या बातम्या