Sunday, May 5, 2024
Homeनाशिकनव्या तंत्रज्ञानासह डिजिटल शेती

नव्या तंत्रज्ञानासह डिजिटल शेती

नाशिक ।प्रतिनिधी Nashik

‘नव्या तंत्रज्ञानासह डिजिटल शेती’ या विषयावरील उत्कृष्टता केंद्र सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सुरू करण्यात येणार आहे.

- Advertisement -

त्यामुळे विद्यार्थी, संशोधक, स्टार्टअप्सला नवीन क्षेत्रात काम करण्याची संधी उपलब्ध होणार आहे. यासाठीच्या करारावर नुकतीच स्वाक्षरी करण्यात आली. यावेळी ऑनलाइनच्या माध्यमातून कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, आंतर-विद्याशाखीय अभ्यास विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. संजीव सोनवणे, सेंटर फॉर इनोव्हेशन, इनक्युबेशन अँड एंटरप्राईजेसच्या संचालिका डॉ. अपूर्वा पालकर, आंत्रप्रिनरशिप डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे (इडीआयआय) संचालक मंडळ सदस्य मिलिंद कांबळे आदी उपस्थित होते.

या उत्कृष्टता केंद्रामार्फत डिजिटल शेती या विषयावर काम करणार्‍या स्टार्टअप्सला मार्गदर्शन केले जाईल, यामध्ये डिजिटल प्रयोगशाळा आणि मेकर स्पेसचा समावेश असेल. उत्कृष्टता केंद्रातर्फे नव्या तंत्रज्ञानाशी निगडित कौशल्य अभ्यासक्रम सुरू केले जातील. विद्यार्थ्यांना नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती मिळेल व त्याद्वारे शेतीशी निगडित समस्यांवर उपाय शोधणारी उत्पादने तयार करता येतील.

- Advertisment -

ताज्या बातम्या