दिंडोरी | प्रतिनिधी | Dindori
येथे नवीन तहसील कार्यालयासमोर सोमवारी रात्री ८.३० वाजता झालेल्या भीषण अपघातात (Accident) वणी पोलीस ठाण्यात (Vani Police Station) नव्याने रुजू झालेले पीएसआय संतोष कडाळे यांच्या वाहनाची दुचाकीला जोरदार धडक बसल्याने अपघात झाला. या अपघातात दुचाकीस्वार शिवदत्त शिंदे यांचा जागीच मृत्यू झाला.
अपघाताची भीषणता एवढी होती की, शिंदे यांच्या पायाला गंभीर दुखापत होऊन तो शरीरापासून वेगळा झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.शिवदत्त शिंदे हे लखमापूर एमआयडीसी (Lakhmapur MIDC) येथील श्वेता प्रिंट अँड पॅक कंपनीत कामाला होते. ते मोटारसायकलवरून जात असताना समोरून आलेल्या पीएसआय संतोष कडाळे यांच्या वाहनाची धडक झाली.
दरम्यान, ही धडक इतकी जोरदार होती की शिंदे यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.या अपघातात पीएसआय कडाळे हे देखील जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आह.याप्रकरणी दिंडोरी पोलिस ठाण्यात (Dindori Police Station) पीएसआय कडाळे यांच्याविरुद्ध अपघातास कारणीभूत म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास दिंडोरी पोलीस करत आहेत.




