Friday, May 3, 2024
Homeनाशिकप्रलंबित निधी मंजूर

प्रलंबित निधी मंजूर

दिंडोरी । प्रतिनिधी Dindori

दिंडोरी शहराच्या विकासासाठी सर्व लोकप्रतिनिधी पक्ष भेद विसरुन एकत्र आल्याने न्यायालयीन प्रक्रियेत अडकलेला निधी परत येण्यास मदत झाली आहे.

- Advertisement -

दिंडोरी नगरपंचायतीचे प्रलंबित 5 कोटी मंजूर झाले असल्याची माहिती दिंडोरी नगरपंचायतीचे गटनेते प्रमोद देशमुख यांनी दिली.

तत्कालीन खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांच्या प्रयत्नांतून मंजूर झालेला निधी न्यायालयीन प्रक्रियेत अडकल्याने विकासकामे संथ गतीनेे होत होती.

मात्र सर्व नगरसेवकांच्या पाठपुराव्यासोबतच विद्यमान विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनीही लक्ष देऊन न्यायालयीन प्रक्रियेत अडकलेला निधीचा विनियोग करण्यासाठी मदत केल्याने प्रलंबित 5 कोटींचा विशेष ठोक निधी दिंडोरी नगरपंचायतीस प्राप्त झाला.

विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, नाशिक जिल्हयाचे माजी पालकमंत्री गिरीष महाजन, दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण, खासदार डॉ.भारती पवार यांच्या सहकार्याने न्यायालयीन बाबीवर तोडगा काढण्यात आला.

दिंडोरी शहराच्या विकासासाठी गटातटाचे राजकारण विसरून सर्व नगरसेवकांनी एकत्रित येत शहरातील विविध प्रभागातील मूलभूत प्रश्न सोडविण्यासाठी अधिकाधिक निधी उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करीत एक चांगला आदर्श घालून दिला.

माजी आमदार रामदास चारोस्कर, माजी नगराध्यक्ष भाऊसाहेब बोरस्ते, नगराध्यक्षा रचना जाधव, उपनगराध्यक्ष कैलास मवाळ, माजी उपनगराध्यक्षा आशाताई कराटे, सचिन देशमुख, तुषार वाघमारे, काकासाहेब देशमुख, दत्तात्रय जाधव, निलेश गायकवाड, साजन पगारे, शामराव मुरकुटे तसेच सर्व नगरसेवकांचे या प्रक्रियेत सहकार्य लाभले.

दिंडोरी शहरातील महत्वाची विकासकामे या निधी अंतर्गत मंजूर झालेली असून लवकरात लवकर शासकीय निविदा प्रक्रिया राबवून वेगाने कामे पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. दिंडोरीच्या विकासासाठी कटीबध्द आहे.

प्रमोद देशमुख माजी नगराध्यक्ष , गटनेते, नगरपंचायत दिंडोरी

- Advertisment -

ताज्या बातम्या