Friday, May 3, 2024
Homeनाशिकजिल्ह्यात स्वाध्याय उपक्रमात दिंडोरी अव्वल

जिल्ह्यात स्वाध्याय उपक्रमात दिंडोरी अव्वल

जानोरी । Janori (वार्ताहर)

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद यांच्या वतीने विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडू नये, गुणवत्ता पूर्ण शिक्षण मिळावे, विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात टिकून ठेवण्यासाठी ऑनलाईन स्वाध्याय 19 आठवड्यापासून सुरु आहे.

- Advertisement -

या आठवड्यात जिल्ह्यात दिंडोरी तालुक्यातील 23047 विद्यार्थ्यांनी स्वाध्याय सोडवला आहे. दिंडोरी तालुका जिल्ह्यात अव्वल ठरला आहे. दिंडोरी शहरातील जिल्हा परिषद क्र. 3 शाळेतील 739 विद्यार्थ्यांनी सोडवला असून तालुक्यात अव्वल शाळा ठरली आहे.

विळवंडी येथील जिल्हा परिषद शाळेतील 370 विद्यार्थ्यांनी स्वाध्याय सोडवला असून त्यांचा व्दितीय क्रमांक आला. तर बी. के. कावळे या विद्यालयातील 360 विद्यार्थ्यांनी सोडवला असून तालुक्यात तिसरा क्रमांक त्यांचा आला आहे.

या उपक्रमात सर्व व्यवस्थापनाच्या शाळा सहभागी होत आहे. स्वाध्याय उपक्रमाला शहरी भागाच्या तुलेनत ग्रामीण भागात चांगला प्रतिसाद मिळत आहे. ऑनलाईन सोबत ऑफलाईन स्वाध्याय सोडविण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या