Saturday, September 5, 2026
Homeब्रेकिंग न्यूजदिंडोरी : नऊ जणांचा बळी घेणारी विहीर बुजवण्याचे काम सुरु

दिंडोरी : नऊ जणांचा बळी घेणारी विहीर बुजवण्याचे काम सुरु

- Advertisement -

दिंडोरी | प्रतिनिधी Dindori

दिंडोरी येथील ज्या विहीरीत कर कोसळून इंदोरे येथील दरगोडे कुटूंबातील नऊ जण मृत्यूमुखी पडले त्या विहीरीला बुजवण्यास सुरवात झाली आहे.
जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गिरीष महाजन त्याचप्रमाणे अन्न व औषध प्रशासनमंत्री ना. नरहरी झिरवाळ यांनी घटनास्थळी भेट दिली असता नागरिकांनी व अपघातग्रस्त मयताच्या नातेवाईकांनी विहीरीबाबत व रस्ताबाबत तक्रार केली.

दोन्ही बाजूला असणारा रस्ता व मध्यभागी विहीर असे असल्याने दिशाभूल झाली. विहीरीला उंच कठडा नसल्याने विहीरीचा भाग रस्ता असल्याचे समजून वाहनचालक सुनील दरगोडे याने सरळ कार नेली. त्यामुळे अपघात झाला असे नातेवाईकांनी सांगितले. ना. गिरीष महाजन यांनी तत्काळ विहीर बुजवण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला दिले.

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनीही तत्काळ अधिकार्‍यांना विहीर बुजवण्याच्या सूचना दिल्या. दुपारी १ वाजता विहीर बुजवण्यासाठी डंपर तसेच ट्रॅक्टर, जेसीबी मागवण्यात आले व काम सुरु केले. विहीरीतील पाणी आणि खोलाईमुळे बरेच मुरुम, दगड, माती लागणार आहे.

ताज्या बातम्या

खुशी हाच माझा स्वभाव; देण्यातच आनंदाचा खरा पासवर्ड – राजयोगी ब्रह्माकुमार...

0
नाशिक | प्रतिनिधी Nashik खुशी हाच माझा स्वभाव आणि धर्म आहे. जीवनातील प्रत्येक कर्म आनंदाने केले पाहिजे. केवळ मिळवण्याच्या मागे धावण्यापेक्षा इतरांना देण्याची वृत्ती आत्मसात...