Friday, May 3, 2024
Homeनगरदिवाळीनंतर राहाता तालुक्यातील करोना रूग्णसंख्येत अडीच पटीने वाढ

दिवाळीनंतर राहाता तालुक्यातील करोना रूग्णसंख्येत अडीच पटीने वाढ

राहाता |तालुका प्रतिनिधी|Rahata

दिवाळीनंतर 5 दिवसांत राहाता तालुक्यात करोना रुग्णांचा वेग अडीच पटीने वाढला असून तालुक्यात सध्या 165 हून अधिक रुग्ण करोनावर उपचार घेत असून

- Advertisement -

आतापर्यंत 53 जणांचा तालुक्यात करोनाने मृत्यू झाला असल्याची माहिती तहसीलदार कुंदन हिरे यांनी दिली.

दिवाळीत सर्व खुले केल्यानंतर राहाता तालुक्यात करोनाने पुन्हा एकदा डोके वर काढायला सुरूवात केली. सध्या तालुक्यातील 165 जणांवर कोव्हिड सेंटरमध्ये उपचार सुरू असून यात शिर्डीच्या कोव्हिड सेंटरमध्ये 121 रुग्णांवर उपचार सुरू असून सातजण अतिदक्षतामध्ये उपचार घेत आहेत.

तर राहाता येथील खाजगी कोव्हिड सेंटरमध्ये 17 रुग्ण उपचार घेत असून लोणी येथील कोव्हिड सेंटरमध्ये 26 रुग्ण उपचार घेतात तर इतर खाजगी रुग्णालयातही काही रुग्ण उपचार घेत आहेत.

मागील आठवड्यात तालुक्यात अवघे 50 रुग्ण उपचार घेत होते. तो आकडा या आठवड्यात अडीच पटीने वाढल्याने आरोग्य विभागाने चिंता व्यक्त केली आहे. तालुक्यातील अनेक गावांत करोना रुग्ण वाढत असून राहाता ग्रामीण रुग्णालयासह तालुक्यात एकूण 532 जणांची टेस्ट केली.

असता त्यात 20 रुग्ण आढळले असून राहाता शहरातील 9 तर शिर्डी शहरातील 4 रुग्ण पॉझिटीव्ह आढळल्याची माहिती राहाता ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.गोकुळ घोगरे यांनी दिली. गेल्या पाच दिवसांत रुग्ण वाढीचे प्रमाण वाढल्याचे त्यांनी यावेळी सांगीतले.

राहाता तालुक्यात आतापर्यंत एकूण 20,667 कोव्हिड टेस्ट करण्यात आल्या असून 2885 जणांना करोनाची लागण झाली होती. त्याचबरोबर 53 रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. तालुक्यात सर्वाधीक 500 रुग्ण एकट्या शिर्डीत आतापर्यंत सापडले आहेत.

साई मंदिर दर्शनासाठी खुले झाल्याने शिर्डीत योग्य ती काळजी घेण्याची गरज आहे. लहान मुले व वृध्दांना दर्शनास बंदी असताना अनेकजण थेट मंदिरात दर्शन घेताना दिसून येत आहेत. तर व्हीआयपी मात्र विना मास्क थेट मंदिरात जात असल्याच्या तक्रारी नागरिक करत आहेत. प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेण्याची गरज आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या