Wednesday, January 7, 2026
HomeनगरAhilyanagar : दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 142 प्रमाणपत्रे डबल जावक क्रमांकाने जारी

Ahilyanagar : दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 142 प्रमाणपत्रे डबल जावक क्रमांकाने जारी

पोलिसांची सिव्हिल सर्जनना नोटीस

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

जिल्हा शासकीय रूग्णालयातील दिव्यांग प्रमाणपत्र प्रक्रिया गंभीर गैरव्यवहारात अडकली असल्याचे आर्थिक गुन्हे शाखेच्या तांत्रिक तपासातून उघड झाले आहे. दस्तऐवजांची पडताळणी करताना तब्बल 142 दिव्यांग प्रमाणपत्रे डबल जावक क्रमांकाने नोंदवून जारी केल्याचे धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या संशयास्पद प्रमाणपत्रांबाबत जिल्हा शल्य चिकित्सकांना नोटीस बजावून सर्व माहिती तातडीने सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

- Advertisement -

दिव्यांग प्रमाणपत्र प्रणालीतील आयडी व पासवर्ड चोरी झाल्याची फिर्याद तोफखाना पोलीस ठाण्यात सुमारे एक वर्षापूर्वी दाखल होती. हा तपास दीर्घकाळ प्रलंबित राहिल्याने जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी याची गंभीर दखल घेत प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग केले. आर्थिक शाखेच्या पथकाने तपासाला गती देत डिजिटल आणि दस्तऐवजांचा तपास केला. त्यात डबल जावक क्रमांक वापरून जारी केलेल्या 142 संशयास्पद प्रमाणपत्रांचा खुलासा झाला. या संशयास्पद प्रमाणपत्रांबाबत जिल्हा शल्य चिकित्सकांना नोटीस बजावून सर्व माहिती तातडीने सादर करण्याचे आदेश पोलिसांनी दिले आहेत.

YouTube video player

आर्थिक गुन्हे शाखेने जिल्हा शासकीय रूग्णालयाकडून सर्व नोंदी, प्रमाणपत्रे, लॉगिन माहिती व संबंधित अधिकारी- कर्मचार्‍यांची भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली आहे. या घोटाळ्याची व्याप्ती मोठी असल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले असून, आणखी काही अधिकारी वा एजंट यात सहभागी असण्याची शक्यता तपासली जात आहे.

नऊ संशयित निष्पन्न
आतापर्यंतच्या तपासात एकूण नऊ संशयित आरोपींची भूमिका निष्पन्न झाली आहे. यामध्ये तिघे जिल्हा रूग्णालयातील कर्मचारी आहेत. काही आरोपींना अटक करण्यात आली असून काहींना उच्च न्यायालयाकडून तात्पुरता जामीन मिळाला आहे. तर दोन आरोपी अद्याप पसार असून त्यांचा शोध सुरू आहे. एका संशयित आरोपीचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी आरोपींची संख्या आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली आहे.

ताज्या बातम्या

Prakash Londhe : रडायचं नाही लढायचं! तासाभरासाठी जेलमधून आलेल्या लोंढेंचा कुटुंबीयांना...

0
नाशिक | Nashik सातपूर (Satpur) येथील ऑरा बार प्रकरणासह खंडणीच्या विविध गुन्ह्यांमध्ये मोक्काच्या कारवाईमधील अटकेत असलेले आरपीआय जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे (Prakash Londhe) यांना काल (मंगळवारी)...