अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
जुन्या वादाचा मनात राग धरून आठ जणांनी युवकाला शिवीगाळ दमदाटी करुन चाकूने वार करून, त्याच्या खुनाचा प्रयत्न केल्याची घटना नगर पुणे रोड वरील इम्पिरियल चौकाजवळील एस एस मोबाईल शॉपी जवळ शुक्रवारी (दि.3) रात्री 10.30 च्या सुमारास घडली. या घटनेने त्या परिसरात पळापळ झाली. व्यावसायिकांनी आपली दुकाने पटापट बंद करून घेतली. विशाल राजेंद्र भंडारी (वय 23, रा. समृध्दी नगर, वाकोडी रोड) असे हल्ल्यात जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे. विशाल याचे साधारण 8 ते 9 महिन्यांपूर्वी सनी शिंदे, (रा.गांधी मैदान, अ.नगर) याच्या सोबत गांधी मैदान येथे किरकोळ वाद झाले होते. ते वाद मिटवले होते. शुक्रवारी रात्री 10 च्या सुमारास विशाल हा त्याच्या मोपेड वरून घरी जात असताना इम्पिरीयल चौकात सनी शिंदे याने त्यास हाक मारली, पण तो थांबला नाही.
काही वेळाने विशाल हा रात्री 10.30 च्या सुमारास एस. एस. मोबाईल शॉपी, नगर पुणे रोड येथे थांबलेला असताना त्याच्या पाठीमागे तीन मोटारसायकल वरुन बंटी ऊर्फ भावेश राऊत (रा. माणिक चौक), आशिष ऊर्फ सनी शिंदे (रा. गांधी मैदान), करण फसले, रजत कडव, सचित देसले, अथर्व दिघे, करण शादिजो, उमेश निस्ताने, (सर्व रा.नगर) हे आले. त्यातील बंटी राऊत शिवीगाळ करु लागला, तेव्हा विशाल त्याला म्हणाला की, तु मला शिवीगाळ का करतोस. त्यावर बंटी राऊत हा म्हणाला ‘तू भाई बनू राहीला का तुझा काटा काढतो एकदाचा’ असे म्हणुन त्याने शर्टची गंचाडी धरुन मागे ओढले व त्याच्यासोबत असणारे आशिष ऊर्फ सनी शिंदे व करण फसले यांना बंटी राऊत म्हणाला की, मला चाकु दे रे, याला संपवुन टाकतो असे म्हणाला असता करण फसले याने त्याचे कमरेला असलेला चाकु काढला व बंटी राऊत यांचे हातात दिला.
तेव्हा बंटी राऊत याचे सोबत असलेल्या साथीदारांना म्हणाला की, यांचे हात पकडा आज यांचा गळा चिरतो असे म्हणुन जिवे ठार मारण्याचे उददेशाने बंटी राऊत याने त्यांचे हातातील धारदार चाकुने विशाल याच्या गळ्यावर जोरात मारत असताना त्याने त्याचा डावा हात मध्ये टाकला असता त्याच्या हाताला लागुन दुखापत झाली. व त्याचवेळी त्याने विशाल याच्या डोक्याचे पाठीमागे, डावे कानाजवळ मारुन दुखापत केली. त्यावेळी विशाल जीव वाचवत असताना झालेल्या झटापटीत एक वार बंटी राऊत कडून करण फसले यांचे उजवे हातावर लागला, त्याचा फायदा घेत विशाल याने त्याची सुटका करून घेतली. त्यावेळी करण फसले, उमेश निस्ताने, रजत कडव, सचित देसले, अर्थव दिघे, करण शादिजो, आशिष ऊर्फ सनी शिंदे यांनी त्याला गचांडुन लाथाबुक्यांनी मारहाण केली.
यावेळी विशाल जोरजोरात ओरडत असताना त्यावेळी रस्त्याने जात असलेले आशिष विजय शिंदे व सोनु शिंदे असे भांडण सोडवण्याकरिता धावून आले असता, त्यांना देखील सनी शिंदे व उमेश निस्ताने यांनी शिवीगाळ करुन तुम्ही येथुन निघुन जा नाहीतर तुमचा देखील काटा काढू अशी धमकी दिली. हा प्रकार पाहून रस्त्याने जाणारे येणारे तसेच त्या परीसरातील लोकांनी त्यांची दुकान बंद करुन लोक सैरावैरा पळु लागले. त्यावेळी बंटी राऊत व त्याचे सोबत त्यांचे मित्र असे तेथून मोटारसायकलवरुन पळुन गेले. त्यानंतर जखमी विशाल याने जिल्हा रुग्णालयात उपचार घेवून शनिवारी (दि.4) सकाळी कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरुन पोलिसांनी बंटी राउतसह आठ जणांना अटक केली आहे.